Virat Kohli Net Worth : विराट कोहलीने आजवर क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड बनवले आहेत. क्रिकेटच्या जगातील दादा माणूस म्हणून विराटकडे पाहिले जाते. या ना त्या कारणाने विराट नेहमीच चर्चेत असतो. अनुष्का शर्मासोबत लग्न झाल्यानंतर विराटची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली. विराट आता जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर बनला आहे. नुकत्याच आलेल्या रिपोर्टनुसार विराटची एकूण संपत्ती 1000 कोटींच्या घरात पोहोचली आहे.

इंस्टाग्रामच्या एका पोस्टसाठी विराट घेतो 9 कोटी
विराट कोहली खेळासोबतच वेगवेगळ्या ब्रॅण्ड्सचा अँबॅसिटॉर सुद्धा आहे. शिवाय मोठमोठ्या कंपन्यांच्या जाहिरातींसाठी विराटला ऑफर असतात. यातून तो बक्कळ पैसे कमवतो. विराट इंस्टाग्रामच्या एका पोस्टसाठी तब्बल 9 करोड रुपये घेतो. तर एका जाहिरातीसाठी विराटची फी 15 कोटी रुपये इतकी आहे.
क्रिकेटच्या एका मॅचमधून विराटला किती रुपये मिळतात?

विराट कोहली बीसीसीआयच्या खेळाडूंच्या यादीत A+ श्रेणीत आहे. विराट एका कसोटी मॅच साठी 15 कोटी रुपये फी घेतो तर एकदिशीय मॅचकरता 6 लाख रुपये अशी त्याची फी आहे. T-20 सामन्यासाठी विराट एका मॅचसाठी 3 लाख रुपये आकारतो. IPL मधून विराट कोहली बक्कळ पैसे छापतो. सध्या विराटचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) सोबत करार आहे. या डीलमधून विराटला वर्षाला 15 कोटी रुपये मिळतात.
जाहिरातीसाठी विराट घेतो बॉलिवूड स्टार्सहून अधिक फी
याशिवाय कोहलीने ब्लू ट्राइब, युनिव्हर्सल स्पोर्ट्सबिझ, एमपीएल आणि स्पोर्ट्स कॉन्व्होसह 7 स्टार्टअप्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. कोहलीने 18 पेक्षा जास्त ब्रँड्ससोबत करार केला आहे. प्रत्येक जाहिरात शूटसाठी विराट दरवर्षी 7.50 ते 10 कोटी रुपये आकारतो. ब्रँड एंडोर्समेंटमधून विराट वर्षाला सुमारे 175 कोटी रुपये कमावतो. बॉलिवूड सेलेब्रिटींपेक्षा विराटला जाहिरातीतून अधिक पैसे मिळतात.
विराटची प्रॉपर्टी काय काय आहे?

कोहलीची मुंबई आणि गुरुग्राममध्ये दोन आलिशान घरे आहेत. त्याच्या मुंबईतील घराची किंमत 80 कोटी रुपये आहे. तर कोहलीचे गुरुग्राममध्ये 31 कोटींचे घर आहे. त्यांच्याकडे 31 कोटी रुपयांच्या आलिशान कार आहेत. कोहली एफसी गोवा फुटबॉल क्लबचाही मालक आहे. एफसी गोवा इंडियन सुपर लीग (आयएसएल) मध्ये भाग घेते. त्याच्याकडे टेनिस आणि कुस्ती संघ देखील आहे.