Vivo G2 : 8GB रॅम सह Vivo ने लाँच केला नवा मोबाईल; किंमतही परवडणारी

Vivo G2 । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने बाजारात नवा मोबाईल लाँच केला आहे. Vivo G2 असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये तुम्हाला 8GB रॅम तसेच 5,000mAh बॅटरी सह अनेक दमदार फीचर्स मिळतात. कंपनीने या मोबाईलची किंमत सुद्धा अगदी परवडणारी अशीच ठेवली आहे. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स आणि त्याच्या किमतीबाबत सविस्तर जाणून घेऊयात…..

   

6.56 इंच डिस्प्ले –

Vivo G2 मध्ये 90Hz रिफ्रेश रेट सह HD+ रिझोल्यूशनसह 6.56 इंचाचा LCD डिस्प्ले दिला आहे. कंपनीने स्मार्टफोनच्या डिस्प्लेमध्ये टीयरड्रॉप नॉच डिझाइन दिले आहे. Vivo G2 मध्ये Dimensity 6020 चिपसेट बसवण्यात आली असून हा मोबाईल Android 13 आधारित Origin OS 3 वर चालतो.

कॅमेरा – Vivo G2

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, यामध्ये पाठीमागील बाजूला 13 मेगापिक्सल चा कॅमेरा देण्यात आला असून एलईडी फ्लॅशची सुद्धा सुविधा आहे तर समोरील बाजूला ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा बसवण्यात आला आहे. Vivo G2 मध्ये 5,000mAh बॅटरी दिली असून ही बॅटरी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. मोबाईल मध्ये ड्युअल सिम, इड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर, 5जी, वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, जीपीएस, 3.5 मिमी हेडफोन जॅकची कनेक्टिव्हिटी यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

किंमत किती??

सध्या Vivo G2 मोबाईल चीन मध्ये लाँच झाला आहे. या मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास 4GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 1199 युआन म्हणजेच अंदाजे 14,000 रुपये आहे. 6GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1499 युआन म्हणजेच अंदाजे 17,700 रुपये, 8 GB + 128GB वेरिएंटची किंमत 1599 युआन म्हणजेच 18,800 रुपये आणि 8GB + 256GB मॉडेलची किंमत 899 युआन म्हणजेच 22,500 रुपये ठेवली आहे.