Vivo S17t खरेदी करायचाय? तर जाणून घ्या फिचर्स आणि स्पेसिफिकेशन

TIMES MARATHI | विवो कंपनीने S17 सिरीजमध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने सिंगल स्टोरेज ऑप्शन मध्ये उपलब्ध केला असून सध्या हा स्मार्टफोन चिनी बाजारामध्ये लॉन्च करण्यात आला आहे. भारतीय बाजारपेठेमध्ये हा स्मार्टफोन केव्हा लॉन्च करण्यात येईल हे अजून सांगण्यात आले नाही.

   

Vivo S17t फिचर्स

Vivo S17t या स्मार्टफोनची किंमत 12 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी 2999 युआन म्हणजेच भारतीय करन्सीनुसार 34000 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. अजून Vivo S17t स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलेला नाही. हा स्मार्टफोन S17 सिरीज मधील एक व्हेरिएंट आहे. Vivo S17t या स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1.5 k रिझोल्युशन आणि 120 hz रिफ्रेश रेट प्रदान करतो. त्याचबरोबर कंपनीने Dimensity 8050 चिपसेट उपलब्ध करून दिले आहे. हा चिपसेट परफॉर्मन्ससाठी उत्तम असल्याचे सांगण्यात येते. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर बेस्ड आहे.

Vivo S17t स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आले आहे. यामध्ये 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, आठ मेगापिक्सल अल्ट्राव्हाइड अँगल लेन्स, 50 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. त्याचबरोबर प्रायमरी कॅमेरासोबत ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन देण्यात आले आहे. Vivo S17t या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम 5G, वायफाय 6, ब्लूटूथ 5.2, जीपीएस, एनएफसी, यूएसबी पोर्ट यासारखे फीचर्स उपलब्ध आहेत.