Vivo ने लाँच केली Vivo S18 सिरीज, जाणून घ्या फीचर्स

टाइम्स मराठी । भारतीय मार्केटमध्ये Vivo या चिनी कंपनीचे वेगवेगळे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. आता Vivo ने नवीन स्मार्टफोन सिरीज लॉन्च केली आहे. ही विवोची Vivo S18 सिरीज असून या सिरीज मध्ये कंपनीकडून VIVO S18, VIVO S18 PRO, VIVO S18e हे तीन मोबाईल लॉन्च करण्यात आले आहे. या सिरीजच्या स्मार्टफोनमध्ये अप्रतिम डिझाईन आणि फीचर्स बघायला मिळत आहे. जाणून घेऊया या मोबाईलचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

Vivo S18 आणि Vivo S18 Pro स्पेसिफिकेशन 

Vivo S18 या स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच फुल-HD, OLED, कर्व्ह डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120 HZ रिफ्रेश रेट ऑफर करतो. यासोबतच हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 7 जेन 3  प्रोसेसरने सुसज्ज आहे.  Vivo S18 Pro या स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच OLED, कर्व्ह FHD डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 120 HZ रिफ्रेश रेट ऑफर करतो. या स्मार्टफोन मध्ये कंपनीने मीडिया ते डायमेनसिटी 9200+ प्रोसेसर दिला आहे.

Vivo S18 आणि Vivo S18 Pro कॅमेरा

Vivo S18 या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेल्या कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर, यात 50MP प्रायमरी  कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर, सेल्फीसाठी 50MP फ्रंट कॅमेरा यामध्ये देण्यात आला आहे. त्याचबरोबर 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज देखील यात मिळू शकते. Vivo S18 Pro यामध्ये 50MP Sony IMX920 प्रायमरी कॅमेरा, 50MP Samsung JNI अल्ट्रा अल्ट्रा सेन्सर, 12MP IMX663 टेलिफोटो सेन्सर आणि सेल्फी साठी 50MP फ्रंट कॅमेरा मिळतो.

Vivo S18 आणि Vivo S18 Pro बॅटरी

Vivo S18 आणि Vivo S18 Pro या दोन्ही स्मार्टफोन मध्ये  5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. आणि Vivo S18e या स्मार्टफोनमध्ये 4800mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Vivo S18e स्पेसिफिकेशन आणि कॅमेरा 

Vivo S18e या स्मार्टफोनमध्ये  6.67 इंच कर्व्ह OLED FHD + डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. या स्मार्टफोन मध्ये कंपनीने  MediaTek Dimensity 7200 प्रोसेसर दिले आहे. यासोबतच 12GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज यामध्ये मिळण्याची शक्यता आहे.  या स्मार्टफोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 2MP सेकंडरी कॅमेरा, 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

किंमत

कंपनीने लॉन्च केलेल्या या Vivo S18 सिरीजच्या किमती बद्दल बोलायचं झालं तर, Vivo S18 या स्मार्टफोनच्या 8 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत RMB 2299 म्हणजेच भारतीय चलनानुसार 22,350 रुपये आहे. Vivo S18 Pro या स्मार्टफोनच्या 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज व्हेरीएंटची किंमत RMB 3199 म्हणजेच भारतीय चलनानुसार 38,100 रुपये आहे. आणि vivo S18e या स्मार्टफोनच्या 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 2099 युआन म्हणजेच 24, 530 रुपये आहे.