Vivo S18 सिरीज होणार लाँच; काय काय फीचर्स मिळणार?

टाइम्स मराठी । भारतीय मार्केटमध्ये Vivo या चिनी कंपनीचे वेगवेगळे मोबाईल उपलब्ध आहेत. आता Vivo कंपनीकडून उद्या नवीन स्मार्टफोन सिरीज लॉन्च करण्यात येणार आहे. Vivo S18 असे या सिरीजचे नाव आहे. या सिरीज मध्ये कंपनीकडून Vivo S18, Vivo S18 Pro , Vivo S18e हे तीन स्मार्टफोन लॉन्च करण्यात येतील. Vivo ची ही सिरीज सुरुवातीला चिनी मार्केटमध्ये लॉन्च होऊ शकते.आज आपण जाणून घेऊया काय असेल या सिरीज मध्ये स्पेशल.

   

Vivo S18 या सिरीज बद्दल डिजिटल चॅट स्टेशन टिपस्टर ने मायक्रो ब्लोगिंग साईट विबोवर माहिती शेअर केली आहे. शेअर केलेल्या माहितीनुसार  या सिरीज चे तिन्ही स्मार्टफोन कलर ऑप्शन मध्ये सादर करण्यात येऊ शकतात. त्यानुसार ग्रीन, ब्लॅक आणि एक मल्टी कलर ऑप्शन असेल. म्हणजेच यामध्ये ड्युअल आणि  मल्टी कलर मिक्स असू शकतात. तसेच Vivo S18 सिरीज मध्ये स्नॅपड्रॅगन 7 जेन 3 आणि डायमेंसिटी  9200+ चिप्स देण्यात येऊ शकतात. कंपनी या दोन्ही चिपसेटवर आधारित मोबाईल डेव्हलप करत आहे. अशी माहिती लिक द्वारे मिळाली आहे. त्याचबरोबर Vivo S18 ही सिरीज 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

Vivo S18 मध्ये napdragon 7 Gen 3 प्रोसेसर देण्यात येईल. यात 2800 nits ब्राइटनेससह OLED डिस्प्ले देखील असेल. हा मोबाईल 5000mAh बॅटरीने सुसज्ज असेल. तसेच मोबाईलच्या स्टोरेज बद्दल सांगायचं झाल्यास, यामध्ये तुम्हाला 8GB, 12GB आणि 16GB रॅम सह 256GB आणि 512GB च्या दोन स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध केले जाईल. दुसरीकडे Vivo S18 Pro मध्ये फ्लॅगशिप-ग्रेड डायमेन्सिटी 9200+ चिपसेट देण्यात येईल. कंपनी या मोबाईल मध्ये 50 मेगापिक्सेल कॅमेरा मिळू शकतोय. तसेच 5000mAh बॅटरी देण्यात येईल. ही बॅटरी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.