Vivo T2 Pro 5G लाँच; या तारखेपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार; किंमत किती?

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये Vivo ने नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Vivo T2 pro 5G असे या मोबाईलचे नाव असून गेल्या अनेक दिवसांपासून या मोबाईलची जोरदार चर्चा सुरु होती. कंपनीने हा मोबाईल मिड रेंज किमतीत लाँच केला आहे. आज आपण या मोबाईलचे फीचर्स, कॅमेरा क्वालिटी आणि त्याच्या किंमतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

   

6.78 इंच डिस्प्ले

Vivo T2 pro 5G मध्ये 6.78 इंच फुल HD AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे . हा डिस्प्ले हाय रेजोल्युशन आणि 120 hz रिफ्रेश सह येतोय. तसेच या डिस्प्लेला 1300 निट्स ब्राईटनेस आणि 1200 हर्ट्स इन्स्टंट हायटच सॅम्पलिंग रेट मिळतोय . Vivo च्या या मोबाईल मध्ये Mediatek Dimensity 7200 चिपसेट उपलब्ध असून Mali-G610 MC4 जीपियू सुद्धा यामध्ये आहे.

कॅमेरा- Vivo T2 Pro 5G

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Vivo T2 pro 5G या स्मार्टफोनमध्ये जबरदस्त कॅमेरा फीचर्स उपलब्ध करण्यात आले आहे . यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन सह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आलाय. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा उपलब्ध आहे. हा दोन मेगापिक्सल कॅमेरा बोकेहमध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच लेन्स ज्या प्रकारे लाईटचा फोकस बिंदूच्या बाहेर करते त्याला बोकेह म्हणतात. तसेच या मोबाईल मध्ये सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सुद्धा मिळतोय.

Vivo T2 pro 5G या स्मार्टफोन मध्ये डाटा स्टोरेज साठी 8 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. या स्मार्टफोन मध्ये पावर साठी 4600 mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्याचबरोबर स्मार्टफोन Android 13 वर फनटच ओएस 13 वर बेस्ड आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम 5g, ब्लूटूथ, वाय-फाय, फिंगरप्रिंट सेंसर यासारखे ऑप्शन उपलब्ध करण्यात आले आहे.

किंमत किती ?

Vivo T2 pro 5G या स्मार्टफोनची किंमत वेगवेगळ्या स्टोरेज व्हेरिएंट प्रमाणे उपलब्ध आहे. यामध्ये 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरीएंट ची किंमत 23,999 एवढी आहे. 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज व्हेरिएंट ची किंमत 24,999 रुपये एवढी आहे. विवो कंपनीने यासोबतच ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर सुद्धा दिलेली आहे. त्यानुसार जर तुम्ही हा स्मार्टफोन ICICI आणि Axis बँकेच्या कार्डच्या माध्यमातून खरेदी करत असाल तर तुम्हाला २००० रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळू शकतो. एवढेच नाही तर कंपनीने यासोबत हजार रुपयांचा अतिरिक्त एक्सचेंज बोनस देखील ठेवला आहे. या स्मार्टफोनची विक्री 29 सप्टेंबर पासून फ्लिपकार्ट आणि विवो ऑफिशियल स्टोअर वर सुरू करण्यात येणार आहे.