Vivo T2 Pro 5G 22 सप्टेंबरला होणार लाँच; फीचर्स काय मिळतील? किंमत किती?

टाइम्स मराठी । प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo भारतीय बाजारपेठेमध्ये नवीन मोबाईल लॉन्च करणार आहे. Vivo T2 pro 5G असं या मोबाईलचे नाव असून हा स्मार्टफोन येत्या 22 सप्टेंबरला लॉन्च होणार आहे. परंतु लॉन्चिंगपूर्वीच हा स्मार्टफोन बेंच मार्किंग साईट गिकबेंच या वेबसाईटवर स्पॉट करण्यात आला आहे. आज आपण या मोबाईल मधील खास फीचर्स जाणून घेणार आहोत.

   

6.38 इंच डिस्प्ले –

Vivo T2 pro 5G या स्मार्टफोनमध्ये 6.38 इंच थ्रीडी कर्व्ह AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा डिस्प्ले हाय रेजोल्युशन आणि 120 hz रिफ्रेश रेट सह येतो. मिळालेल्या माहितीनुसार या स्मार्टफोनमध्ये Mediatek Dimensity 7200 चिपसेट उपलब्ध करण्यात येऊ शकतो. यासोबतच Mali-G610 MC4 जीपियू देखील मिळण्याची शक्यता आहे.

कॅमेरा – Vivo T2 pro 5G

Vivo T2 pro 5G या स्मार्टफोनमध्ये जबरदस्त कॅमेरा फीचर्स उपलब्ध होऊ शकतात. यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सल असू शकतो. या स्मार्टफोन मध्ये डाटा स्टोरेज साठी 8 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज, 8 GB व्हर्च्युअल रॅम उपलब्ध असल्याचे लिस्टिंग मध्ये दिसत आहे.

5000 mAh बॅटरी-

Vivo T2 pro 5G या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh बॅटरी मिळू शकते. ही बॅटरी सुपरवूक फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्याचबरोबर स्मार्टफोन Android 13 वर फनटच ओएस 13 वर बेस्ड असल्याचे सांगण्यात येत आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम 5g, ब्लूटूथ, वाय-फाय, फिंगरप्रिंट सेंसर यासारखे ऑप्शन उपलब्ध करण्यात येऊ शकतात.