Vivo ने लाँच केले नवीन ईयर बर्ड्स; दणदणीत आवाज, 30 तासांपर्यंत चार्जिंग बॅकअप

टाइम्स मराठी । आज- काल इयर बर्ड्सची मोठ्या प्रमाणात चलती दिसून येते. त्यानुसार बऱ्याच कंपन्या वेगवेगळ्या फीचर्ससहित नवनवीन इयर बर्ड्स लॉन्च करत आहे. त्यानुसार आता Vivo कंपनीने देखील नवीन इयर बर्ड्स लॉन्च केले आहे. कंपनीने हे नवीन इयर बर्ड्स २ कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केले असून ऑफिशियल वेबसाईटवर हे इयर बर्ड्स लिस्ट करण्यात आले. Vivo च्या या नवीन इयर बर्ड्सचे नाव Vivo TWS AIR 2 आहे. जाणून घेऊया या इयर बर्ड्स चे स्पेसिफिकेशन.

   

डिझाईन

Vivo TWS AIR 2 या नवीन इयर बर्ड्स मध्ये कंपनीने स्टेमसह इन इयर डिझाईन उपलब्ध केलं आहे. हे इयर बर्ड्स Apple Airpod प्रमाणे दिसतात. Vivo कंपनीच्या या इयर बर्ड्स मध्ये डस्ट आणि वॉटर रजिस्टन्ट साठी IP54 रेटिंग देण्यात आलं असून हे एअरबर्ड पेबल शेप मध्ये चार्जिंग के सह उपलब्ध करण्यात आले आहे. यामध्ये स्टेमवर टच कंट्रोल मिळत असून वेगवेगळे फंक्शन कंट्रोल करता येतात.

साउंड

Vivo TWS AIR 2 या इयर बर्ड्स मध्ये अप्रतिम साऊंड कॉलिटी साठी 14.2 mm ड्रायव्हर्स उपलब्ध करण्यात आले आहे. हे साऊंड गोल्डन इयर स्पेशालिस्ट द्वारा ट्यून करण्यात आले असून यामध्ये इमर्सिव्ह साऊंड एक्सपिरीयन्स साठी थ्रीडी पॅनोरमिक साऊंड आणि डीपएक्स 3.0 साउंड उपलब्ध करण्यात आले आहे. या सोबतच कॉलिंग वेळी आवाज व्यवस्थित येण्यासाठी या इयर बर्ड्समध्ये आय कॉल नॉईसचा वापर करण्यात आला आहे. या AI कॉल नॉईसच्या माध्यमातून बॅकग्राऊंडला असलेला आवाज कमी करता येतो. यामुळे हे इयर बर्ड्स क्लिअर कॉल क्वालिटी देतात हे स्पष्ट होतेय.

बॅटरी

Vivo TWS AIR 2 या इयर बोर्ड मध्ये 55 ms अल्ट्रा लो लेटेन्सी मोड उपलब्ध करण्यात आला आहे. कंपनीने हे इयर बर्ड्स नाईट ब्ल्यू आणि मॉर्निंग व्हाईट कलर मध्ये लॉन्च केले आहे. या इयर बर्ड्स सोबत ब्लूटूथ 5.3 कनेक्टिव्हिटी ऑन बोर्ड उपलब्ध आहे. विवो कंपनीचे हे इयर बर्ड्स एकदा चार्ज केल्यानंतर सहा तासांपर्यंत टिकते . यासोबतच 30 तासांपर्यंत बॅटरी लाईफ या इयर बर्ड्स मध्ये मिळते.