Vivo V29 & Vivo V29 Pro लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । चिनी स्मार्टफोन ब्रांड Vivo ने आपले २ नवीन मोबाईल Vivo V29 आणि Vivo V29 Pro भारतीय बाजारात लाँच केले आहेत. हिमालयन ब्ल्यू, मॅजेस्टिक रेड आणि स्पेस ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये तुम्ही हे दोन्ही मोबाईल खरेदी करू शकता. त्यासाठी तुम्हाला Vivo च्या वेबसाईटवर, तसेच फ्लिपकार्ट, रिलायन्स डिजिटल, ऑफलाइन स्टोअर्सला भेट द्यावी लागेल. यासोबतच कंपनीने  HDFC आणि SBI कार्ड च्या माध्यमातून ऑनलाईन स्मार्टफोन खरेदी केल्यास इन्स्टंट डिस्काउंट ऑफर लॉन्च केली आहे. एवढेच नाही तर ऑफलाइन खरेदीवर सुद्धा सूट देण्यात येणार आहे. आज आपण या दोन्ही मोबाईलचे खास फीचर्स जाणून घेऊयात.

   

स्पेसिफिकेशन

Vivo V29 आणि Vivo V29 Pro या नुकत्याच लॉन्च झालेल्या स्मार्टफोन मध्ये स्पेसिफिकेशन सेम देण्यात आले आहे. त्यानुसार या दोन्ही स्मार्टफोन मध्ये 6.78 इंच चा  AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120 HZ रिफ्रेश रेट सह येतो. Vivo V29 मध्ये कंपनीने क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर उपलब्ध करून दिला आहे . तर Vivo V29 Pro मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 8200 प्रोसेसर देण्यात आले आहे. हे दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर आधारित Funtouch OS 13 वर काम करतात .

Vivo V29 कॅमेरा

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Vivo V29 या स्मार्टफोनमध्ये पंच होल कट आउट मध्ये  50 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा फिट करण्यात आला आहे. यासोबतच  50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सल अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा, दोन मेगापिक्सल मोनोक्रोम सेंसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेला प्रायमरी कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन OIS ला सपोर्ट करतो.

Vivo V29 Pro कॅमेरा

Vivo V29 Pro या स्मार्टफोनमध्ये  50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. हा प्रायमरी कॅमेरा ऑप्टिकल  इमेज स्टॅबिलायझेशन OIS ला सपोर्ट करतो. यासोबतच 12 मेगापिक्सल पोर्ट्रेट लेन्स, ८ मेगापिक्सल अल्ट्राव्हाइड अँगल लेन्स या स्मार्टफोनमध्ये देण्यात आली आहे. दोन्ही स्मार्टफोन मध्ये  4600mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 80 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Vivo V29 किंमत

मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, Vivo V29 हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंट मध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.त्यानुसार 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिएंट ची किंमत  32,999 एवढी आहे. त्याचबरोबर 12 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिएंट ची किंमत 36,999 एवढी आहे. हा स्मार्टफोन 17 ऑक्टोंबर पासून विक्रीसाठी खुला करण्यात येणार आहे.

Vivo V29 Pro किंमत

Vivo V29 Proहा स्मार्टफोन देखील दोन व्हेरियंट मध्ये उपलब्ध असून यातील 8 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिएंट ची किंमत  39,999 एवढी आहे. तर 12 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिएंट ची किंमत 42,999 एवढी आहे. या स्मार्टफोनमध्ये हिमालयन ब्ल्यू आणि स्पेस ब्लॅक कलर ऑप्शन उपलब्ध आहे. या स्मार्टफोनचे प्री बुकिंग सुरू करण्यात आलं असून 10 ऑक्टोबर पासून तुम्ही हा स्मार्टफोन  खरेदी करू शकता.