Vivo V29e 5G ची ऑनलाईन विक्री सुरु; पहा किंमत आणि ऑफर्स

टाइम्स मराठी । चिनी टेक कंपनी विवोने 28 ऑगस्टला भारतीय मार्केटमध्ये vivo V29e 5G हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. आता या स्मार्टफोनची विक्री 7 सप्टेंबर पासून सुरू करण्यात आली आहे. तुम्ही देखील हा स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट वर हा मोबाईल खरेदी करू शकता. यासोबतच कंपनीने सेलिंग वेळी काही ऑफर्स देखील ठेवल्या आहेत. तर जाणून घेऊया या स्मार्टफोन खरेदीवर असलेल्या ऑफर्स आणि या स्मार्टफोनचे फीचर्स.

   

स्पेसिफिकेशन

vivo V29e 5G हा स्मार्टफोन 6.78 इंच फुल HD+AMOLED 3D कर्व्ह डिस्प्ले सह उपलब्ध करण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1300 नीट पिक ब्राईटनेस आणि 120 Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. या स्मार्टफोनमध्ये Qualcomn Dnapdragon 695 प्रोसेसर देण्यात आले आहे. या मोबाईल मध्ये 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यासोबतच Android 13 वर आधारित सॉफ्टवेअर स्क्रीन यामध्ये देण्यात आली आहे.

कलर ऑप्शन

vivo V29e 5G या स्मार्टफोनमध्ये ड्युअल पॅटर्न बॅक, डायमंड कट डिझाईन, ग्लास फिनिश देण्यात आली आहे. यासोबतच स्मार्टफोनमध्ये कलर चेंज करणारा ग्लास बॅक पॅनल देण्यात आला आहे. त्यानुसार मोबाईल मध्ये आर्टिस्टिक रेड आणि आर्टिस्टिक ब्ल्यू कलर ऑप्शन देण्यात आले आहे. यासह मोबाईल अल्ट्रा लार्ज पेपर चेंबर कुलिंग सिस्टीम यामध्ये देण्यात आली आहे. जेणेकरून मल्टीटास्किंग साठी मदत मिळेल.

कॅमेरा आणि स्टोरेज– Vivo V29e 5G

vivo V29e 5G या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेल्या कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर , यात OIS बेस्ड प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सल, वाईड अँगल कॅमेरा 8 MP आणि समोरील बाजूला 50 MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये देण्यात आलेल्या स्टोरेज व्हेरीएंट बद्दल बोलायचं झालं तर यात 8GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज तसेच 8GB RAM आणि 256 GB स्टोरेज हे दोन ऑप्शन देण्यात आले आहे.

किंमत आणि ऑफर

Vivo V29e 5G या स्मार्टफोनची विक्री फ्लिपकार्ट वर सुरू झाली आहे. मोबाईलच्या 8GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरियंट ची किंमत 26,999 रुपये एवढी आहे. तर 8GB RAM आणि 256 GB स्टोरेज व्हेरीएंट ची किंमत 28,999 रुपये एवढी देण्यात आली आहे. फ्लिपकार्ट वर या दोन्ही स्मार्टफोनवर 5000 रुपयांपर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे. यासोबतच कंपनीने बँक ऑफरच्या माध्यमातून देखील सूट दिली आहे. त्यानुसार जर तुम्ही बँक ऑफ बडोदा च्या क्रेडिट कार्ड वरून हा स्मार्टफोन खरेदी करत असाल तर तुम्हाला 10 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते.

बँक आणि एक्सचेंज ऑफर

जर तुम्ही एचडीएफसी आणि एसबीआय क्रेडिट डेबिट कार्ड ट्रांजेक्शन वर हा स्मार्टफोन खरेदी करत असाल तर तुम्हाला 2500 रुपये डिस्काउंट मिळू शकतो. तसेच जर तुम्ही ॲक्सिस बँक कार्डवर हा स्मार्टफोन खरेदी करत असाल तर तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक मिळू शकतो . विवो कंपनीचा हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला एक्सचेंज ऑफर देखील देण्यात येत आहे. या ऑफरनुसार जुना मोबाईल देऊन त्याबदल्यात तुम्हाला 25,050 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.