Vivo V29e मोबाईल झाला स्वस्त; कमी पैशात खरेदी करण्याची संधी

Vivo V29e : प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Vivo ने आपल्या Vivo V29e मोबाईलची किंमत कमी केली आहे. Vivo V29e हा स्मार्टफोन एकूण २ स्टोरेज व्हेरिएन्ट मध्ये बाजारात उपलब्ध असून या दोन्ही मॉडेलच्या किमती १००० रुपयांनी स्वस्त करण्यात आल्या आहेत. एवढच नव्हे तर मोबाईलच्या खरेदीवर कंपनी 2000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट सुद्धा ऑफर करत आहे. म्हणजेच ग्राहकांना एकूण ३००० रुपयांनी कमी पैशात हा मोबाईल खरेदी करता येणार आहे.

   

Vivo V29e च्या 8GB + 128GB मॉडेलची किंमत 26,999 रुपये आहे मात्र आता मोबाईल 25,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. तर 8GB + 256GB स्टोरेज व्हेरिएन्टची किंमत 28,999 रुपये असून हाच मोबाईल 27,999 रुपयांना खरेदी करता येईल. जर तुम्ही HDFC बँक किंवा ICICI बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट करून मोबाईल खरेदी केल्यास, 2000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळत आहे. तसेच जर तुमच्याकडं जास्त रक्कम नसेल तर 6 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआयचा लाभ घेऊ मोबाईल खरेदी करू शकता.

काय आहेत फीचर्स – Vivo V29e

Vivo V29e मध्ये 6.78 इंचाचा कर्व्ह AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्ले ला 2400 x 1080 पिक्सेल रिझोल्युशन आणि 1300 nits पर्यंत पीक ब्राइटनेस मिळतो. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर बसवला असून हा मोबाईल Android 14 वर आधारित Funtouch OS 14 या ऑपरेटिंग सिस्टीम वर चालतो. मोबाईलच्या कॅमेरा बाबत सांगायचं झाल्यास, पाठीमागील बाजूला 64MP मुख्य कॅमेरा, आणि 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. तर समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 50MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.