Vivo V30 Lite 5G : 12GB रॅम सह Vivo ने लाँच केला 5G मोबाईल; किंमत किती पहा

Vivo V30 Lite 5G : तंत्रज्ञानाच्या या दुनियेत एकामागून एक मोबाईल बाजारात येत आहेत. सध्याच्या फास्ट जगात ग्राहकांना परडवेल आणि सर्व सुखसुविधा मिळतील असे अपडेटेड मोबाईल मार्केट मध्ये आणण्याचा प्रयत्न सर्वच कंपन्या करत आहेत. त्यातच आता प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Vivo ने नवा 5G मोबाईल लाँच केला आहे. Vivo V30 Lite 5G असे या स्मार्टफोनचे नाव असून यामध्ये कंपनीने अतिशय जबरदस्त फीचर्स दिले आहेत. आज आपण या मोबाईल बाबत संपूर्ण माहिती आणि त्याच्या किमतीबाबत जाणून घेणार आहोत.

   

6.67 इंच डिस्प्ले –

Vivo V30 Lite 5G मध्ये कंपनीने 120Hz रिफ्रेश रेट सह 6.67 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. हा या डिस्प्ले मध्ये 1080 x 2400 पिक्सेल रिझोल्युशन, 1,150 nits ब्राइटनेस आणि 394 ppi डेंसिटी मिळते. विवोच्या या मोबाईल वजन 190 ग्रॅम आहे. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये Snapdragon 695 चिपसेट बसवली असून हा मोबाईल Android 13 सह FunTouch OS 13 वर काम करतो.

कॅमेरा – Vivo V30 Lite 5G

Vivo V30 Lite 5G मध्ये पाठीमागील बाजूला 64-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड लेन्स आणि 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 50 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोन मध्ये 4,800mAh बॅटरी दिली असून ही बॅटरी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

अन्य फीचर्स –

मोबाईलच्या अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, Vivo V30 Lite 5G मध्ये ड्युअल सिम, USB-C पोर्ट , NFC,, 5GHz Wi-Fi, Bluetooth 5.1, GPS, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर यांसारखे फीचर्स मिळतात.

किंमत किती?

सध्या तरी हा मोबाईल मेक्सिकोमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. त्याठिकाणी हा मोबाईल 8,999 मेक्सिकन पेसो म्हणजेच भारतीय चलनानुसार 44,000 रुपये आहे. हा मोबाईल फॉरेस्ट ब्लॅक आणि रोज गोल्ड रंगात उपलब्ध आहे. लवकरच हा मोबाईल भारतात सुद्धा लाँच होऊ शकतो.