Vivo V30, V30 Pro मोबाईल भारतात लाँच; 50MP सेल्फी कॅमेरासह मिळतात ‘हे’ खास फीचर्स

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Vivo ने आपले Vivo V30 आणि Vivo V30 Pro हे दोन्ही मोबाईल भारतात लाँच केले आहेत. यापूर्वी हे दोन्ही स्मार्टफोन कंपनीने इंडोनेशियामध्ये सादर करण्यात आले होते. यामध्ये 50MP सेल्फी कॅमेरासह अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. येत्या 14 मार्चपासून विवोचे हे दोन्ही मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध असतील. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि त्याच्या किमतीबाबत सविस्तर जाणून घेउयात

   

6.78 इंचाचा डिस्प्ले-

Vivo V30, V30 Pro मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78 इंचाचा कर्व्ह डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2,800 x 1,260 पिक्सेल रिझोल्युशन, 300Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 2,800 nits पीक ब्राइटनेस सह येतो. यातील Vivo V30 मोबाईल मध्ये स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे तर V30 Pro मध्ये MediaTek Dimensity 8200 चिपसेट बसवण्यात आली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन Android 14-आधारित Funtouch OS 14 या ऑपरेटिंग सिस्टीम वर चालतात.

कॅमेरा –

मोबाईलच्या कॅमेराबद्दल सांगायचं झाल्यास, Vivo V30 मध्ये 50-मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा आणि 50-मेगापिक्सेलचा सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर . Vivo V30 Pro मध्ये 50-मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा, 50-मेगापिक्सेलचा सेकंडरी कॅमेरा आणि 50-मेगापिक्सेल पोर्ट्रेट कॅमेरा देण्यात आलाय. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी दोन्ही मोबाईलला समोरील बाजूला 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. दोन्ही मोबाईल मध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली असून हि बॅटरी 80W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती ?

Vivo V30 च्या 8GB + 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 33,999 रुपये, 8GB + 256G मोबाईल ची किंमत 35,999 रुपये आणि 12GB + 512GB स्टोरेज व्हेरिएन्टची किंमत 37,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन निळ्या, काळ्या आणि हिरव्या रंगात तुम्ही खरेदी करू शकता. तर दुसरीकडे Vivo V30 Pro च्या 8GB + 256GBस्टोरेज व्हेरिएन्टची किंमत 41,999 रुपये आहे आणि 12GB + 512GB व्हेरिएंट 46,999 रुपयांत तुम्ही खरेदी करू शकता. हा मोबाईल निळ्या आणि काळ्या रंगात उपलब्ध आहे.