Vivo भारतात लाँच करणार पहिला फोल्डेबल मोबाईल; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Vivo भारतीय बाजारात प्रथमच फोल्डेबल मोबाईल लाँच करण्याची योजना आखत आहे. Vivo X Fold 3 Pro असे या फोल्डेबल मोबाईलचे नाव असून यापूर्वी हा मोबाईल चीन मध्ये लाँच केलाय. आता हा स्मार्टफोन भारतात लाँच करण्याचा कंपनीचा विचार आहे. कदाचित जून महिन्यात हा स्मार्टफोन भारतात येण्याची शक्यता आहे. असं झाल्यास हा भारतीय बाजारात Vivo चा पहिला फोल्डेबल फोन ठरेल. या मोबाईलमध्ये काय खास फीचर्स मिळतील ते आपण जाणून घेऊयात ….

   

8.03-इंचाचा डिस्प्ले-

Vivo X Fold 3 Pro मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 8.03-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आलाय. यातील कव्हर डिस्प्ले 6.53-इंचाचा आहे. कंपनीने यामध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर बसवला आहे. स्मार्टफोनमध्ये 16GB रॅम आणि 1TB स्टोरेजचा पर्याय दिला आहे. यामध्ये Vivo V3 चिप देण्यात आली आहे. ओप्पोचा हा फोल्डेबल स्मार्टफोन Android 14 वर आधारित Origin OS या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो.

कॅमेरा –

मोबाईलला ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याची प्राथमिक लेन्स 50MP आहे, 64 मेगापिक्सलचा अल्ट्रा अँगल आणि 50 मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा कॅमेरा आहे. तसेच समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 32MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. याशिवाय पॉवरसाठी, 5700mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 100W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

ओप्पोचा हा मोबाईल काळा आणि पांढरा अशा २ रंगात उपलब्ध असून त्याची किंमत सुमारे 1280 युरो आहे. Vivo X Fold 3 Pro ची थेट स्पर्धा Samsung Galaxy Z Fold 5, OnePlus Open सारख्या स्मार्टफोनशी होईल.