फ्लिपकार्टवर धमाकेदार ऑफर! ‘Vivo’ चा स्मार्टफोन मिळतोय फक्त 550 रुपयांत; तब्बल 34 टक्के डिस्काउंट

टाईम्स मराठी | तुम्ही जर एखादा चांगला आणि दमदार कॉलिटीचा स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. बाजारात अनेक कंपन्यांनी स्मार्टफोनवर विशेष ऑफर देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये ‘Vivo Y02’ स्मार्टफोनचा देखील समावेश आहे. कंपनीने ‘Vivo Y02’ स्मार्टफोनवर खास ऑफर जारी केली आहे. त्यामुळे तुम्ही सहज एक महागडा स्मार्टफोन कमी किमतीत खरेदी करू शकता.

   

खास ऑफर

तुम्हाला जर Vivo Y02 स्मार्टफोन खरेदी करायचा असला तर तो तुम्हाला फ्लिपकार्ट वरून ऑर्डर करावा लागेल. या फोनची किंमत १२,९९९ रुपये असली तरी देखील तो तुम्हाला फ्लिपकार्टवर ३४ टक्के डिस्काउंटसह ८,४९९ रुपयांना मिळत आहे. हा फोन खरेदी करताना तुम्हाला त्यावर वेगवेगळ्या बँकच्या ऑफर देखील मिळत आहेत. जर तुम्ही हा स्मार्टफोन एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड वरून खरेदी केला तर तुम्हाला १,२५० रुपयांना मिळत आहे. परंतु यासाठी तुम्हाला 15,000 रुपयांचा फोन खरेदी करावा लागेल.

विशेष म्हणजे तुम्ही जर तुमचा जुना स्मार्टफोन फ्लिपकार्ट वरून परत केला तर तुम्हाला ७,९५० रुपयांची सूट मिळू देण्यात येत आहे. तुम्ही नवीन फोनच्या बदल्यात जुना फोन देऊन नवीन फोन आणखीन कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता. परंतु यासाठी तुमचा जुना फोन हा व्यवस्थित चालणारा असायला हवा. त्या फोनमध्ये जर काही बिघाड असला तर तो फोन स्वीकारला जाणार नाही. या ऑफरमुळे नवी फोनसाठी खूप कमी किंमत मोजावी लागेल.

Vivo Y02 फीचर्स

Vivo Y02 या स्मार्टफोनमध्ये 32GB+3GB RAM देण्यात आले आहे. तसेच Vivo Y02 फोन आकर्षित युनिबॉडी डिझाइनसह उपलब्ध आहे. यासह Vivo Y02 ला आकाराचा डिस्प्ले आणि प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी ही उपलब्ध आहे. यासोबतच मायक्रोएसडी कार्डने फोनची स्टोरेज क्षमता १ टीबीपर्यंत वाढवता येते. अशा अनेक फीचर्स हा फोन कंपनीकडून ऑफर मध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.