Vivo Y100i 5G : Vivo ने लाँच केला 12 GB रॅम वाला मोबाईल; किंमतही परवडणारी

टाइम्स मराठी । स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo भारतीय बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये स्मार्टफोन लॉन्च करत असते. आता कंपनीने जागतिक बाजारात Y सिरीज मध्ये  नवीन मीड रेंज मोबाईल लॉन्च केला आहे. विवो कंपनीने हा नवीन मोबाईल तरुण पिढीच्या गरजा लक्षात घेत  डिझाईन केला असून  यामध्ये अप्रतिम रॅम आणि जास्त स्टोरेज देण्यात आले आहे. या नवीन लॉन्च करण्यात आलेल्या स्मार्टफोनचे नाव Vivo Y100i 5G आहे. कंपनीने या मोबाईल मध्ये वेगवेगळे फीचर्स उपलब्ध केले असून हा स्मार्टफोन दोन कलर व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. जाणून घेऊया या मोबाईलचे स्पेसिफिकेशन आणि किंमत.

   

स्पेसिफिकेशन

Vivo Y100i 5G या स्मार्टफोनमध्ये  6.64 इंच LCD, FHD + डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2388 × 1080 पिक्सल रिझोल्युशन आणि 240 hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्शन  6020 प्रोसेसर दिला आहे. मोबाईल मध्ये 5000 mAh बॅटरी वापरण्यात आली असून ही बॅटरी 44 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

कॅमेरा– Vivo Y100i 5G

Vivo Y100i 5G या स्मार्टफोनमध्ये  50 MP प्रायमरी कॅमेरा, 2 MP AI कॅमेरा सेंसर, 8 MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. नवीन लॉन्च करण्यात आलेल्या स्मार्टफोन मध्ये उपलब्ध असलेल्या स्टोरेज बद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये 12 GB रॅम आणि 512 GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. जेणेकरून फोटोज व्हिडिओ आणि बाकीच्या गोष्टी सेव करण्यासाठी मदत होईल. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये कनेक्टिव्हिटी साठी 3.5 mm हेडफोन जॅक उपलब्ध केला आहे.

किंमत किती?

Vivo Y100i 5G मध्ये ब्ल्यू आणि पिंक कलर व्हेरिएंट उपलब्ध आहे. मोबाईलच्या किमतीबाबत, 12 GB रॅम आणि 512 GB स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 1599 युवान म्हणजेच भारतीय चलनानुसार 18,400 रुपये आहे.