Vivo Y100i Power : 50MP कॅमेरा, 6000mAh बॅटरीसह Vivo ने लाँच केला नवा मोबाईल

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने Y100 सीरीज मध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. Vivo Y100i Power असे या मोबाईलचे नाव असून सध्या तरी हा मोबाईल चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. कंपनीने या मोबाईल मध्ये 50MP कॅमेरा, 6000mAh बॅटरीसह अनेक दमदार फीचर्स दिले आहेत. आज आपण Vivo च्या या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किमतीबाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

   

6.64 इंच डिस्प्ले –

Vivo Y100i Power मध्ये 120Hz रिफ्रेश रेट सह 6.64 इंच फुल HD+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे पिक्सल रिझोल्यूशन 1080 x 2388 इतकं आहे. Vivo च्या या मोबाईल मध्ये Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर देण्यात आला असून हा स्मार्टफोन Android 13 वर आधारित Origin OS 3 वर काम करतो. या मोबाईलची लांबी 164.64mm, रुंदी 75.8mm, आणि जाडी 9.1mm आहे. तसेच या मोबाईलचे वजन 199.6 ग्रॅम आहे.

कॅमेरा – Vivo Y100i Power

Vivo Y100i Power या मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, यामध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ कॅमेरा मिळतो. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीने या मोबाईल मध्ये 6,000mAh बॅटरी दिली असून ही बॅटरी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. मोबाईलच्या स्टोरेजबद्दल सांगायचं झाल्यास, यामध्ये 12GB आणि 512GB इनबिल्ट स्टोरेज मिळतंय. तसेच व्हर्च्युअल रॅमद्वारे आणखी 12GB पर्यंत ही रॅम वाढवता येते.

अन्य फीचर्स –

मोबाईलच्या अन्य फिचरबाबत सांगायचं झाल्यास, Vivo Y100i Power मध्ये ड्युअल सिम, 5G, वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, GPS आणि USB Type C पोर्ट यांसारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात. मोबाईलच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर Vivo Y100i पॉवरची किंमत 2,099 युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार अंदाजे 24,535 रुपये आहे. हा स्मार्टफोन काळ्या, पांढर्‍या आणि निळ्या रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.