टाइम्स मराठी । चिनी ब्रँड Vivo कंपनीने Y सिरीज मध्ये आणखीन एक स्मार्टफोन ऍड केला आहे. कंपनीने सिंगापूर नंतर भारतीय बाजारपेठेमध्ये आपला Vivo Y17s हा मोबाईल लॉन्च केला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन ग्लिटर पर्पल, मिस्ट्रीक ग्रीन या दोन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केला आहे. इतर मोबाईलच्या तुलनेत हा मोबाईल काही प्रमाणात स्वस्त असुन त्याची किंमत व्हेरिएंट नुसार वेगवेगळी आहे. त्यानुसार 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 11,499 रुपये आहे तर दुसरीकडे 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरीएंटची किंमत 12,499 रुपये आहे. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स, कॅमेरा क्वालिटी याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
6.56 इंच डिस्प्ले-
Vivo Y17s या स्मार्टफोनमध्ये 6.56 इंच चा IPS एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 720 × 1612 पिक्सेल hd रिझोल्युशन आणि 60 hz रिफ्रेश रेटसह येतो. तसेच या डिस्प्लेमध्ये तुम्हाला 840 निट्स ब्राईटनेस आणि 83% NTSC कलर सरगम, 269 पीपीआय पिक्सेल डेन्सिटी देखील मिळेल. एवढेच नाही तर हा डिस्प्ले गेमिंग आणि मल्टीमीडिया अनुभव सुधारण्यासाठी देखील मदत करतो.
कॅमेरा- Vivo Y17s
Vivo Y17s मध्ये 50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच 2 मेगापिक्सेल बोकेह लेन्स देखील उपलब्ध आहे. या बोकेह लेन्समुळे फोटोग्राफीमध्ये शानदार अनुभव मिळतो. आणि फोटोज वेगवेगळ्या अँगल मध्ये चांगल्या प्रकारे क्लिक करता येतो. तसेच सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
स्टोरेज –
Vivo Y17s या स्मार्टफोन मध्ये मीडियाटेक हेलियो G85 चीपसेट देण्यात आलं असून हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर बेस्ड फनटच OS 13 वर चालतो. या स्मार्टफोन मध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज उपलब्ध आहे. हे स्टोरेज मायक्रो एसडी कार्ड च्या माध्यमातून वाढवता येऊ शकते. या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 15 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.