Vivo Y18 : अवघ्या 8,999 रुपयांत Vivo ने लाँच केला 50MP कॅमेरावाला मोबाईल

टाइम्स मराठी । लोकप्रिय मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने भारतीय बाजारात सर्वसामान्य ग्राहकाला सुद्धा परवडेल अशा किमतीत नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. Vivo Y18 असे या मोबाईलचे नाव असून हा मोबाईल Vivo Y18e चे अपग्रेड मॉडेल आहे. मोबाईलच्या बेस व्हेरिएन्टची किंमत फक्त 8,999 रुपये आहे. त्यामुळे हा स्वस्तातील मोबाईल खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्यातील आहे. विवोचा हा स्वस्तात मस्त मोबाईल बाजारात धुमाकूळ घालेल यात शंकाच नाही. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन जाणून घेणार आहोत.

   

6.56 इंचाचा डिस्प्ले –

Vivo Y18 मध्ये 90 Hz रिफ्रेश रेटसह 6.56 इंचाचा HD + रिझोल्यूशन डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 1612×720 पिक्सल रिझोल्यूशन आणि 840 nits पीक ब्राइटनेस मिळतो. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर वापरला असून यामध्ये 4GB RAM +64GB स्टोरेज आणि 4GB RAM + 128GB स्टोरेज पर्याय देण्यात आला आहे. तुम्ही वर्चुअल रॅमच्या माध्यमातून ही रॅम आणखी 4GB पर्यंत वाढवू शकता.

50-मेगापिक्सेल कॅमेरा – Vivo Y18

मोबाईलच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल सांगायचं झाल्यास, Vivo Y18 मध्ये पाठीमागील बाजूला 50-मेगापिक्सेल प्राइमरी कॅमेरासह VGA कॅमेरा सेन्सर बसवण्यात आली आहे तर समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी विवोच्या या स्मार्टफोन मध्ये 5000 mAh ची शक्तिशाली बॅटरी देण्यात आली असून हि बॅटरी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती?

आता राहिला प्रश्न तो म्हणजे मोबाईलच्या किमतीचा…. तर Vivo Y18 च्या 4GB RAM +64GB स्टोरेज मॉडेलची किंमत 8,999 रुपये आहे तर 4GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएन्टची किंमत 9,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन काळ्या आणि हिरव्या रंगात उपलब्ध असून तुम्ही Vivo कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वरून हा मोबाईल खरेदी करू शकता.