Vivo Y200 5G भारतात लाँच; 64 MP कॅमेरा, किंमत किती?

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Vivo भारतीय बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या कॅमेरा फीचर्सच्या माध्यमातून स्मार्टफोन लॉन्च करत असते. आताही सणासुदीच्या काळात Vivo ने भारतीय बाजारपेठेमध्ये Vivo Y200 5G हा नवा मोबाईल लाँच केला आहे. यामध्ये तुम्हाला फोटोग्राफी साठी 64 MP कॅमेरासह अनेक दमदार फीचर्स पाहायला मिळत आहेत. चला आज आपण या मोबाईल बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात….

   

स्पेसिफिकेशन

Vivo Y200 5G मध्ये  6.67 इंचचा AMOLED FHD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120 HZ रिफ्रेश रेटसह येत असून यामध्ये तुम्हाला 91% स्क्रीन टू बॉडी रेशो मिळतोय. Vivo च्या या स्मार्टफोन मध्ये स्नॅपड्रॅगन 4 जेन 1 प्रोसेसर देण्यात आला असून हा मोबाईल Android 13 वर आधारित असलेल्या FUNTOUCH OS 13 वर काम करतो.

कॅमेरा– Vivo Y200 5G

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Vivo Y200 5G मध्ये मध्ये ड्युअल रियर सेटअप उपलब्ध करण्यात आला आहे. यामध्ये 64 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल बोकेह लेन्स मिळत आहे तर समोरील बाजूला 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच कंपनीने यामध्ये ओरा लाईट देखील उपलब्ध केले आहे. त्यानुसार यामध्ये लाईव्ह, पोट्रेट, नाईट मोड यासारखे फीचर्स देण्यात आले आहे.

कनेक्टिव्हिटी फीचर्स

Vivo Y200 5G या स्मार्टफोनमध्ये कंपनीने फिंगरप्रिंट सेंसर, फेस अनलॉक,  WIFI , GPS , ब्लूटूथ, ऑडिओ जॅक, USB TYPE C पोर्ट यासारखे बरेच फीचर्स उपलब्ध केले आहेत. यामध्ये 4800 MAH बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 44 W च्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या मोबाईलचे वजन 190g एवढे आहे. म्हणजेच हा स्मार्टफोन स्लिक प्रोफाइलमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.

किंमत किती?

Vivo Y200 5G या स्मार्टफोन मध्ये 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. या स्मार्टफोनची किंमत 21,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तुम्ही हा मोबाईल विवो कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईट आणि डिटेल स्टोअर वरून खरेदी करू शकता.