टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल निर्माता Vivo कंपनी लवकरच नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. विवो कंपनीचा हा अपकमिंग स्मार्टफोन 5g डिवाइस मध्ये उपलब्ध होणार असून पुढच्या महिन्यामध्ये भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. Vivo Y200 असे या आगामी मोबाईलचे नाव असून कंपनीकडून लॉन्चिंग बाबत ऑफिशियल माहिती मिळाली नाही. परंतु मोबाईलचे ट्रेनिंग मटेरियल नुकतेच लिक झाले आहे. त्यानुसार स्पेसिफिकेशन आणि फीचर्स चा खुलासा करण्यात आला आहे.
स्पेसिफिकेशन
Vivo Y200 या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले देण्यात येऊ शकतो. हा डिस्प्ले 120 T रिफ्रेश रेट आणि 38 कलर टेंपरेचर लेवल ला सपोर्ट करेल. या स्मार्टफोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 1 चिपसेट देण्यात येऊ शकतो. Vivo Y200 हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 बेस्ड फनटच OS 13 वर काम करेल. तसेच मोबाईल मध्ये 7.69 mm स्लिम 2D ग्लास रियर पॅनलवर मिळू शकतो. या स्मार्टफोनचे वजन 190g एवढे असू शकते.
कॅमेरा सेटअप – Vivo Y200
Vivo Y200 या स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर आयताकार कॅमेरा मॉड्युल देण्यात येणार आहे. यामध्ये एलईडी फ्लॅश आणि ओरा लाईटसह राऊंडेड कॅमेरा कटआउट मिळेल. या मोबाईल मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल. यामध्ये OIS सपोर्ट सह 64 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा मिळेल. त्याचबरोबर दोन मेगापिक्सेल बोकेह कॅमेरा देण्यात येऊ शकतो. तसेच सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात येणार आहे. एवढेच नाही तर यामध्ये वेडिंग स्टाईल पोर्ट्रेट मोड देखील उपलब्ध असेल.
स्टोरेज आणि बॅटरी
Vivo Y200 या स्मार्टफोनमध्ये 8 GB रॅम आणि 128 GB देण्यात येऊ शकते. त्याचबरोबर ही रॅम 16 जीबी पर्यंत वाढवता येईल. म्हणजेच रॅम एक्सटेंड करण्यात येऊ शकते. मोबाईल मध्ये 4800 mAh बॅटरी कंपनीकडून देण्यात येऊ शकते. ही बॅटरी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. ह्या स्मार्टफोन फोटोमध्ये आकर्षक दिसत असून हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेमध्ये कमी किमतीत लॉन्च करण्यात येऊ शकतो.