Vivo Y200e 5G : 50MP कॅमेरासह Vivo आणणार नवा मोबाईल; या तारखेला आहे लॉंचिंग

Vivo Y200e 5G : प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Vivo आपला नवा मोबाईल Vivo Y200e 5G येत्या २२ फेब्रुवारी लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन Vivo च्या Y200 सीरीजचा पार्ट आहे. गेल्या काही दिवसांपासून या स्मार्टफोनच्या लौंचिंगबाबत माहिती समोर येत होती. या मोबाईलचा लूक आणि डिझाईन सुद्धा समोर आली होती. आता अधिकृतपणे या मोबाईलची लौंचिंग डेट जाहीर झाली असून त्यानुसार २२ फेब्रुवारीला हा स्मार्टफोन बाजारात येणार आहे. आज आपण मोबाईलचे खास फीचर्स आणि किमतीबाबत सविस्तर जाणून घेऊयात…

   

लूक आणि डिझाईन- Vivo Y200e 5G

मोबाईलच्या लूक आणि डिझाईनबाबत सांगायचं झाल्यास, Vivo Y200e 5G ला अतिशय आकर्षक असा लूक मिळत आहे. मोबाईलच्या पाठीमागील बाजूला तुम्हाला लेदरेट बॅक पॅनलचा वापर करण्यात आलेला दिसेल. ज्यामुळे हातात मोबाईल धरताना तो घसरणार नाही. स्मार्टफोनच्या पाठीमागे वरच्या डाव्या बाजूला एक लांब आयताकृती आकाराचा कॅमेरा मॉड्यूल दिला जाईल. ज्यामध्ये ३ बॅक कॅमेरे आणि एलईडी फ्लॅश बसवण्यात येईल. कंपनी हा फोन 20,000 रुपयांच्या किंमतीध्ये लॉन्च करू शकते.

फीचर्स काय ?

Vivo Y200e 5G मध्ये 6.67-इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले असू शकतो, हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. कंपनीकडून या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. तसेच हा मोबाईल Android 13 किंवा Android 14 वर काम करेल. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झालयास, विवोच्या या स्मार्टफोन मध्ये 50MP मुख्य कॅमेरा देण्यात येईल तसेच समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 16MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध असू शकतो. रिपोर्ट्सनुसार, Vivo चा हा मोबाईल 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह लाँच होण्याची शक्यता आहे. याशिवाय मोबाईल मध्ये 8GB व्हर्चुअल रॅम देखील दिली जाऊ शकते.