Vivo Y27 5G लॉन्च; 50 MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी अन् बरंच काही

टाइम्स मराठी । चिनी मोबाईल ब्रँड Vivo ने आपल्या Y सिरीज अंतर्गत Vivo Y27 5G मोबाईल लाँच केला आहे. कंपनीने आपल्या या मोबाईल मध्ये अनेक दमदार फीचर्स दिले असून हा स्मार्टफोन मिस्टिक ब्लॅक आणि सॅटिन पर्पल या दोन कलर लाँच करण्यात आला आहे. मोबाईलची किंमत नेमकी किती असेल हे अद्याप कंपनीने जाहीर केलेलं नाही. चला आज आपण Vivo Y27 5G चे काही खास फीचर्स जाणून घेऊयात.

   

6.64 इंचाचा डिस्प्ले –

या स्मार्टफोनमध्ये 6.64 इंच चा LCD डिस्प्ले देण्यात आलेला असून हा डिस्प्ले फुल HD, 2388×1080 पिक्सल रिझोल्युशनसह उपलब्ध आहे. हा मोबाईल मीडिया टेक ऑक्टा कोर 6nm डायमेन्शन सह 6020 SoC आणि आणि अँड्रॉइड 13 वर आधारित आहे. Vivo Y27 5G चे वजन 190g असून यात नॅनो आणि हायब्रीड ड्युअल सिम ऑप्शन देण्यात आलेला आहे.

50 MPचा मुख्य कॅमेरा-

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायच झाल्यास, यामध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, २ मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर उपलब्ध आहे. याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी समोरील बाजूला ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. त्याचबरोबर यामध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आलेली आहे. ही बॅटरी 15W वायर चार्जिंगला सपोर्ट करते.

स्टोरेज किती ? (Vivo Y27 5G)

Vivo Y27 5G या स्मार्टफोनमध्ये 4 जीबी आणि 6 जीबी रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज असे २ वेरियंट मिळतात. मोबाईलच्या कनेक्टीव्हिटी बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये ड्युल सिम कार्ड स्लॉट, SA, NSA, Wifi 802. 11 b, g, n, ac, ब्लूटूथ V5.1, GPS, FM रेडिओ, OTG सपोर्ट, NFC, USB Type C पोर्ट असे फीचर्स मिळतात.