Vivo Y27 भारतात लॉन्च, 50 MP कॅमेरा, 128GB स्टोरेज; किंमत किती?

टाइम्स मराठी । चिनी ब्रँड Vivo या कंपनीने Vivo ने आपला Y27 लॉन्च केला आहे. हा कंपनीचा लेटेस्ट बजेट फोन असून शानदार फीचर्सने परिपूर्ण असा स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन Burgundy black आणि Garden Green दोन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर 6GB रॅम सह 128GB इंटरनल स्टोरेजमध्ये असून या मोबाईल ची किंमत 14,999 एवढी आहे. तुम्ही देखील हा स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर फ्लिपकार्ट, अमेझॉन, विवो इंडिया इ स्टोअरवर उपलब्ध करून दिलेला आला आहे.

   

6.64 इंच डिस्प्ले –

Vivo Y27 या स्मार्टफोनमध्ये 6.64 इंच चा LCD FHD डिस्प्ले देण्यात आलेला आहे. हा डिस्प्ले फुल HD, 2388×1080 पिक्सल रिझोल्युशन सह येतो. स्मार्टफोनमध्ये मीडिया टेक हेलिओ G85 प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा अँड्रॉइड 13 वर बेस्ड असून FuntouchOS 13 वर काम करतो. मोबाईल मध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 44W वायर चार्जिंगला सपोर्ट करते.

50 मेगापिक्सल कॅमेरा – Vivo Y27

मोबाईलच्या कॅमेरा बाबत सांगायचं झाल्यास Vivo Y27 स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसरआणि सेल्फी तसेच व्हिडिओ कॉल साठी समोरील बाजूला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर यामध्ये रियर फ्लॅश देखील उपलब्ध आहे. यात photo, Night, Portrait, Video, 50MP, Panorama, Live photo, slow-mo, Time-lapse, pro, documents यासारखे मोड्स उपलब्ध आहेत.

अन्य फीचर्स –

Vivo Y27 या स्मार्टफोन हा 4 GB रॅम + 128GB इंटरनल स्टोरेज आणि 6 GB + 128GB इंटरनल स्टोरेज असा २ वेरियंट मध्ये उपलब्ध आहे. मोबाईलच्या अन्य फीचर्स बाबत सांगायचं झाल्यास यामध्ये ब्लूटूथ 5.0, यूएसबी टाइप सी चार्जिंग, जीपीएस, एफएम आणि सिक्युरिटी साठी फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आलेला आहे.