Vivo Y27s : 50 MP कॅमेरासह Vivo ने लाँच केला नवा मोबाईल; किंमतही परवडणारी

टाइम्स मराठी । चिनी ब्रँड Vivo कंपनी भारतीय बाजारपेठेमध्ये एकापेक्षा एक स्मार्टफोन लॉन्च करत असते. आता या कंपनीने Y सिरीज मध्ये आणखीन एक स्मार्टफोन ऍड केला आहे. Vivo Y27s असे या मोबाईलचे नाव असून यापूर्वीच्या VIVO Y27 आणि Y27 5G या दोन्ही मोबाईलच्या तुलनेत हा मोबाईल अतिशय अप्रतिम असा आहे. सध्या हा मोबाईल इंडोनेशियामध्ये लॉन्च करण्यात आला असून काळ्या आणि हिरव्या कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. कंपनीने हा मोबाईल एकूण २ स्टोरेज व्हेरीएंट मध्ये लाँच केला आहे.

   

स्पेसिफिकेशन

Vivo Y27s या स्मार्टफोनमध्ये 90  HZ रिफ्रेश रेट सह 6.64 इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले  FHD + पंच होल कटआउट मध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. या स्मार्टफोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 SOC प्रोसेसर मिळतो . याशिवाय कंपनीने यामध्ये 5000 MAH बॅटरी दिली असून ही बॅटरी 44 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

कॅमेरा- Vivo Y27s

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Vivo Y27s मध्ये  50 MP प्रायमरी कॅमेरा, 2 MP डेप्थ सेंसर आणि समोरील बाजूला 8 MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनला IP54 सर्टिफिकेशन मिळाले आहे. म्हणजेच तुम्ही हा स्मार्टफोन पाणी किंवा धूळ कोणत्याही परिस्थितीमध्ये वापरू शकतात. तसेच सिक्युरिटी साठी मोबाईल मध्ये मध्ये साईड माउंटेन फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आले आहे.

किंमत किती

आता राहिला प्रश्न तो म्हणजे किमतीचा, तर Vivo Y27s च्या 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत IDR 2,399,000 म्हणजेच भारतीय चलनानुसार, 12,800 रुपये आहे. यासोबतच 12 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिएंट ची किंमत IDR 2,799,000 म्हणजेच 14,900 रुपये आहे.