Vivo Y28s 5G मोबाईल 8GB रॅम, 50MP कॅमेरासह लाँच

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी विवोने जागतिक बाजारात आपला Vivo Y28s 5G हा मोबाईल लाँच केला आहे. . हा स्मार्टफोन गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लॉन्च झालेल्या Vivo Y27s चा अपग्रेड आहे. 8GB रॅम, 50MP कॅमेरासह या स्मार्टफोनमध्ये अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. भारतात हा मोबाईल कधी लाँच होईल याबाबत मात्र कोणतेही डिटेल्स समोर आले नाहीत. आज आपण विवोच्या या मोबाईलचे खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन जाणून घेणार आहोत.

   

डिस्प्ले –

Vivo Y28s 5G मध्ये , 90Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्पेला 840 nits पीक ब्राइटनेस मिळतो. तसेच या डिस्प्लेमध्ये वॉटरड्रॉप नॉच देण्यात आलाय. कंपनीने आपल्या या नव्या स्मार्टफोन मध्ये MediaTek डायमेंशन 6300 प्रोसेसर बसवला असून विवोचा हा मोबाईल Android 14 वर आधारित Funtouch OS 14 या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. मोबाईल मध्ये 8GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज देण्यात आलं असून हे स्टोरेज microSD कार्ड स्लॉटद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते.

कॅमेरा – Vivo Y28s 5G

मोबाईलच्या कॅमेरा सेटअपबद्दल सांगायचं झाल्यास, Vivo Y28s 5G मध्ये पाठीमागील बाजूला 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आहे, तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी समोरील बाजूला 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी स्मार्टफोन मध्ये 5,000mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 15W चार्जिंगला सपोर्ट करते. अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, विवोच्या या नव्या मोबाईलमध्ये ड्युअल-बँड वायफाय, ब्लूटूथ, 5G, USB-C पोर्ट आणि 3.5mm जॅक यांसारखी वैशिष्ट्ये मिळतात. मोबाईल किंमत अजून कंपनीने जाहीर केलेली नाही.