12GB रॅमसह Vivo ने लाँच केले 2 नवे मोबाईल; किंमत किती पहा?

टाइम्स मराठी । लोकप्रिय मोबाईल निर्माता ब्रँड Vivo ने मार्केटमध्ये २ नवीन मोबाईल लाँच केले आहेत. Vivo Y37 आणि Vivo Y37m असं या दोन्ही स्मार्टफोनची नावे असून सध्या फक्त चिनी बाजारात हे मोबाईल लाँच कऱण्यात आले आहेत. या दोन्ही मोबाईल मध्ये 6.56 इंच डिस्प्ले, 13 मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. आज आपण या दोन्ही मोबाईलचे स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

   

6.56-इंचाचा डिस्प्ले-

Vivo Y37 आणि Y37m या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.56-इंचाचा डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 1612×720 पिक्सेल रीझोल्युशन आणि 89.64% स्क्रीन टू बॉडी रेशोसह येतो. कंपनीने या मोबाईल मध्ये Mediatek Dimensity 6300 प्रोसेसर दिला आहे. मोबाईल मध्ये 4GB, 6GB किंवा 8GB रॅमचा पर्याय आहे तर 128GB किंवा 256GB इनबिल्ट स्टोरेज यामध्ये देण्यात आलं आहे. विवोचे हे दोन्ही स्मार्टफोन्स Android 14 वर आधारित OriginOS 14 वर काम करतात.

कॅमेरा –

मोबाईलच्या कॅमेराबद्दल सांगायचं झाल्यास, Vivo Y37 आणि Y37m मध्ये पाठीमागील बाजूला 13-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा असून सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 5-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा बसवण्यात आला आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली असून हि बॅटरी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, Vivo Y37 आणि Y37m मध्ये 5G, 4G, ड्युअल नॅनो सिम स्लॉट, 2.4G/5G Wi-Fi, Bluetooth 5.4, USB टाइप C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक यांसारखे फीचर्स मिळतात.

किंमत किती?

Vivo Y37 च्या 4GB+128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,199 युआन (अंदाजे 13,788 रुपये), 6GB+128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,499 युआन (अंदाजे 17,213 रुपये), 8GB+128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,199 युआन आहे. (अंदाजे 20,725 रुपये), 8GB+ 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,999 युआन (अंदाजे 22,979 रुपये) आणि 12GB + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 2,099 युआन (अंदाजे 24,151 रुपये) आहे.