Vivo Y38 5G मोबाईल 6000mAh च्या शक्तिशाली बॅटरीसह लाँच; 8GB RAM, 50 MP कॅमेरा अन बरंच काही…

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने जागतिक नबाजारात आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. Vivo Y38 5G असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये 8GB RAM, 50 MP कॅमेरा यांसारखी अनेक खास फीचर्स देण्यात आली आहेत. सध्या हा मोबाईल तैवान मध्ये लाँच झाला असून त्याच्या किमतीबाबत मात्र कंपनीने कोणतीही माहिती अद्याप दिलेली नाही. आज आपण विवोच्या या हँडसेटचे खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.

   

6.68 इंचाचा डिस्प्ले –

Vivo Y38 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट सह 6.68 इंचाचा IPS LCD पॅनल डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला HD+ 1612 x 720 पिक्सेल रिझोल्यूशन आणि हे 1000 nits पीक ब्राइटनेस मिळतो . कंपनीने आपल्या या नव्या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 4 Gen 2 चिपसेट बसवली असून या आधारे मोबाईल मध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज मिळतंय. खास बाब म्हणजे विवो चा हा मोबाईल Android 14 वर आधारित FunTouch OS 14 या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो.

50-मेगापिक्सलचा कॅमेरा– Vivo Y38 5G

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Vivo Y38 5G मध्ये 50-मेगापिक्सलचा कॅमेरा, 2-मेगापिक्सेलचा सपोर्टिव्ह लेन्स देण्यात आली आहे तर समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉलसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 6000mAh ची महाशक्तीशाली बॅटरी बसवण्यात आली असून ही बॅटरी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

अन्य फिचर –

अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, विवोच्या या स्मार्टफोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर, ड्युअल सिम, 5G, वाय-फाय, ब्लूटूथ, NFC, USB-C पोर्ट यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. सध्या या मोबाईल तैवान मध्ये लाँच करण्यात आला असून त्याची किमत मात्र लवकरच कंपनीकडून जाहीर करण्यात येईल.