टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Vivo ने काही महिन्यांपूर्वी Y56 हा स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च केला होता. आता विवो कंपनीने Y56 हा स्मार्टफोन 5g व्हेरिएंट मध्ये आणि परवडणाऱ्या किंमतीत लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनच्या 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंट ची किंमत 16,999 एवढी आहे. तसेच 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज या व्हेरिएंटची किंमत 18 हजार 999 एवढी आहे. यापूर्वी लॉन्च करण्यात आलेल्या Y56 ची किंमत 19,999 रुपये एवढी होती.
Vivo Y56 5G Specification
Vivo Y56 5G या स्मार्टफोनमध्ये 6.58 इंच FHD डिस्प्ले उपलब्ध आहे. हा डिस्प्ले 2408×1080 पिक्सेल रिझोल्युशन आणि 60 hz रिफ्रेश रेट सह येतो. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेंनसिटी 700 ऑक्टाकोर प्रोसेसर उपलब्ध आहे. यासोबतच Vivo Y56 5G हा स्मार्टफोन android 13 वर बेस्ड असून Funtouch OS वर काम करतो. कंपनीने पावर बॅकअपसाठी या मोबाईल मध्ये 5000 mAh बॅटरी दिली असून ही बॅटरी 18w फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
कॅमेरा – Vivo Y56 5G
Vivo Y56 5G या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेल्या कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर 50 MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. हा प्रायमरी कॅमेरा f/1.8 अपर्चरसह उपलब्ध आहे. यासोबतच सेकंडरी कॅमेरा f/2.4 अपर्चरसह 2 MP चा आणि समोरील बाजूला 16 MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
अन्य फीचर्स –
Vivo Y56 5G स्मार्टफोनमध्ये साईड माउंटेन फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आले आहे. यासोबतच 5G, 4G LTE, ड्युअल बँड wifi, ब्लूटूथ, GPS, USB टाईप सी पोर्ट यासारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स उपलब्ध आहेत.