Vivo ने लाँच केला स्वस्तात मस्त Mobile; पहा फीचर्स आणि किंमत

टाइम्स मराठी । चिनी ब्रँड Vivo या कंपनीने नवीन स्मार्टफोन Vivo Y77t लॉन्च केला आहे. यापूर्वी विवोने या स्मार्टफोनची सिरीज लॉन्च केली होती. या सिरीज मध्ये Y77, Y77e, Y77e (t1) हे स्मार्टफोन होते. आता यामध्ये Y77t ची सुद्धा भर पडली आहे. आज आपण Y77t चे फीचर्स आणि त्याच्या किमतीबद्दल जाणून घेणार आहोत.

   

6.64 इंचाचा डिस्प्ले –

Vivo Y77t या स्मार्टफोनमध्ये 6.64 इंच चा फुल HD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट सह उपलब्ध आहे. हा डिस्प्ले 2388 × 10800 पिक्सेल रिझोल्युशनसह उपलब्ध असून 240 Hz टच सॅम्पलिंग रेट सह येतो. Vivo Y77t स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर आधारित ओरिजिन OS 3 प्रोसेसर वर काम करतो. यामध्ये आता कोर मीडिया टेक डायमेन्शन 7020 Soc चिपसेट देण्यात आला आहे. Vivo Y77t स्मार्टफोन मध्ये कनेक्टिव्हिटी साठी डुअल 4G VoLTE, वाई-फाई 6, ब्लूटूथ 5.2, जीपीएस,यूएसबी टाइप-सी आणि 3.5mm ऑडियो जैक देखील उपलब्ध आहे.

Vivo Y77t कॅमेरा

Vivo Y77t या स्मार्टफोनच्या कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50 मेगा पिक्सल प्रायमरी रियल सेंसर उपलब्ध असून दुसरा कॅमेरा 2 मेगापिक्सलचा आहे. याशिवाय सेल्फी आणि विडिओ कॉल साठी मोबाईलच्या समोरील बाजूला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. मोबाईल मध्ये 5000 mAhची दमदार बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 44W वायर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Vivo Y77t किंमत

Vivo Y77t हा स्मार्टफोन ब्लॅक, झेड ब्लू, फिनिक्स फेदर गोल्ड या कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. हा मोबाइल दोन स्टोरेज व्हेरिएंट मध्ये लाँच करण्यात आली असून त्यानुसार त्याच्या किमती सुद्धा वेगवेगळ्या आहेत. सध्या हा मोबाईल फक्त चीन मध्ये लाँच करण्यात आला असून लवकरच तो भारतातही येऊ शकतो. Vivo Y77t च्या 8GB रॅम आणि 128 GB स्टोरेज वेरियंट मध्ये उपलब्ध असलेल्या स्मार्टफोनची किंमत 1,399 चिनी युआन म्हणजेच 16000 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तर 12 GB रॅम आणि 256 GB इनबील्ड स्टोरेज वेरियंट ची किंमत 1599 चिनी युआन म्हणजेच 18000 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.