Vivo Y78t : 50 MP कॅमेरासह Vivo ने लाँच केला नवा Mobile; पहा किंमत

टाइम्स मराठी । चिनी ब्रँड Vivo ही कंपनी वेगवेगळ्या सिरीज मध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च करत असते. त्यानुसार आता या कंपनीने Y सीरीज अंतर्गत नवीन मोबाईल लाँच केला आहे. सध्यातरी हे लौंचिंग चीनमध्ये लॉन्च करण्यात आले असून लवकरच भारतीय बाजारपेठेमध्ये देखील लॉंच करण्यात येण्याची शक्यता आहे. या लॉन्च झालेल्या नवीन मोबाईलचे नाव Vivo Y78t आहे. आज आपण या मोबाईल चे खास फीचर्स आणि त्याच्या किमतीबाबत जाणून घेऊयात.

   

स्पेसिफिकेशन

Vivo Y78t या स्मार्टफोनमध्ये 6.64 इंच डिस्प्ले उपलब्ध करण्यात आला आहे. हा डिस्प्ले  फुल HD LCD पॅनल सह येत असून यामध्ये हा डिस्प्ले 1080 × 2388 पिक्सल रिझोल्युशन आणि 120 hz रिफ्रेश रेट मिळतो. या डिस्प्लेचा टच सॅम्पलिंग रेट हा 240 hz एवढा आहे. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 प्रोसेसर दिला असून हा मोबाईल अँड्रॉइड तेरा वर बेस्ड ORIGINOS 3.0 ऑपरेटिंग सिस्टीम वर काम करतो.

कॅमेरा– Vivo Y78t

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास Vivo Y78t मध्ये 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सल बोकेहे लेन्स आणि LED फ्लॅश उपलब्ध करण्यात आले  आहे. तसेच समोरील बाजूला सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीने या मोबाईल मध्ये 6000 mAh बॅटरी दिली असून ही बॅटरी 44 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज उपलब्ध केले आहे. यासोबतच 12 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज देखील यामध्ये उपलब्ध आहे.

कनेक्टिव्हिटी फीचर्स

Vivo Y78t मध्ये कनेक्टिव्हिटी साठी कंपनीने वेगवेगळे फीचर्स उपलब्ध केले आहे. त्यानुसार यामध्ये 4G वोल्ट, वायफाय 802.11 एसी, ब्लूटूथ 5.1, GPS, यूएसबी टाइप सी पोर्ट, 3.5mm ऑडिओ जॅक, यासारखे बरेच फीचर्स उपलब्ध करण्यात आले आहे. हा स्मार्टफोन ड्युअल सिमला देखील सपोर्ट करतो.

किंमत किती ?

Vivo Y78t च्या 12 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,499 युवान म्हणजेच भारतीय चलनानुसार 17 हजार रुपये एवढी आहे. कंपनीने हा स्मार्टफोन ब्लॅक, व्हाईट आणि ग्रीन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केला आहे.