Volkswagen ने लॉन्च केल्या 2 साऊंड एडिशन कार; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स  

टाइम्स मराठी | भारतीय बाजारपेठेत Volkswagen या ब्रँडच्या कार प्रचंड विकल्या जातात. 2016-17 मध्ये जगातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी म्हणून ओळख असलेल्या Volkswagen या कंपनीच्या कार आज देखील तरुण पिढीला मोठ्या प्रमाणात आकर्षित करत आहेत. त्यातच आता Volkswagen ने  Volkswagen Taigun Sound Edition आणि Volkswagen Virtus Sound Edition लॉन्च केले आहे. सध्या सोशल मीडियावर या दोन्ही एडिशनचे टीजर लॉन्च करण्यात आले आहे. जाणून घेऊया दोन्ही एडिशनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

किंमत

Volkswagen Virtus Sound Edition आणि Volkswagen Taigun Sound Edition या दोन्ही कार कंपनीच्या बाकीच्या कारच्या टॉपलाईन ट्रिम वर आधारित आहे. VIRTUS एडिशन ची एक्स शोरूम  किंमत 15.52 लाख रुपये आहे. Taigun एडिशन ची एक्स शोरूम किंमत 16.33 लाख रुपये आहे. या दोन्ही कार भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या Hyundai Creta आणि Honda City ला टक्कर देतील.

Virtus चे स्पेसिफिकेशन

Volkswagen Virtus Sound Edition या कारमध्ये कंपनीकडून 1.0 लिटर पावरफुल इंजिन  देण्यात येणार आहे. हे इंजिन 115 PS पावर  आणि 175 nm पीक टॉर्क जनरेट करेल. या इंजिन सोबत 6 स्पीड गियरबॉक्स आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. हे इंजिन कारला हाय स्पीड  प्रदान करू शकेल. कंपनीने कार मध्ये 3 सिलेंडर असलेले इंजिन बसवलं आहे. हे इंजिन खराब रस्त्यावर अप्रतिम परफॉर्मन्स देईल. ही कार टर्बो चार्ज्ड पेट्रोल इंजिन सह उपलब्ध करण्यात येणार आहे.

फीचर्स

Volkswagen Virtus Sound Edition या कारमध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, लेदर सीट अपहोल्स्ट्री, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट, ऑटो ड्रीमिंग  IRVM, रेन सेंसिंग वायपर, पुश बटन इंजिन स्टार्ट स्टॉप , डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, इलेक्ट्रिक सनरुफ यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. यासोबतच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, सेफ्टी साठी एअरबॅग्स देखील देण्यात आले आहे.

Taigun चे स्पेसिफिकेशन

Volkswagen Taigun Sound Edition या कार मध्ये कंपनीने 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन 113 BHP पावर आणि 178 nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिन सोबत 6 स्पीड मॅन्युअल आणि सहा स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन जोडण्यात आले आहे. कंपनीने या कार मध्ये बरेच बदल केले असून यामध्ये ड्रायव्हर  संचालित सिटे देण्यात आली आहे. या कारमध्ये सनरूफ आणि रियर व्ह्यू मिरर वर कॉन्ट्रास्ट कलर दिसून येतो.

फिचर्स

Volkswagen Taigun Sound Edition कारच्या सी पिलरवर साऊंड एडिशन बॅज आणि ग्राफिक्स बघायला मिळतात. या कार मध्ये 7 स्पीकर साऊंड सिस्टिम देण्यात आली आहे. त्याचबरोबर सब उपर आणि ऍम्प्लिफायर देखील कार मध्ये उपलब्ध करण्यात आले. या कारमध्ये पावर्ड फ्रंट सीट ऑफर करण्यात आले आहे. यासोबतच कार मध्ये एअर बॅग, टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम मिळते.