Volkswagen ने लाँच केलं Taigun चे GT Edge Trail Edition; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । भारतीय कार बाजारात Volkswagen या ब्रँडच्या कार सर्वात जास्त विकल्या जातात. Volkswagen कंपनीच्या कार आजच्या पिढीला अट्रॅक्ट करतात. आता कंपनीने नवीन मीड साईज SUV लॉन्च केली आहे. ही मीड साईज SUV Taigun चे GT Edge Trail एडिशन आहे. या नवीन  Volkswagen Taigun GT Edge Trail Edition ची एक्स शोरूम किंमत  16.29 लाख रुपये आहे.  कंपनीने या SUV च्या इंटिरियर मध्ये बरेच कॉस्मेटिक बदल केले असून यामध्ये वेगवेगळे फीचर्स देखील उपलब्ध आहेत. यासोबतच कंपनीने या मिड साइज एसयूव्ही मध्ये ट्रॅक्शन मोड देखील उपलब्ध केले आहे.

   

डिझाईन

Volkswagen Taigun GT Edge Trail Edition च्या ट्रेल थीम मध्ये ग्राफिक्स आणि रुफ सेल्स, ग्रील मध्ये क्रोम आणि फंक्शनल रुफ सेल्स देण्यात आले आहे. यासोबतच या SUV मध्ये ब्लॅक डोअर आणि रेड टच सह ORVM देखील उपलब्ध आहे. या SUV मध्ये 16 इंच डिजाइनर व्हील्स आणि रियर मध्ये ट्रेल बेंज वापरण्यात आले आहे. Volkswagen TAIGUN SUV च्या इंटेरियर बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये बरेच कॉस्मेटिक अपडेट्स करण्यात आले आहे. त्यानुसार यामध्ये 3D फ्लोर मॅट्स, लेदर सीट कव्हर्स,  स्टेनलेस स्टील पॅन्डल देण्यात आले आहे.

फिचर्स

Volkswagen Taigun GT Edge Trail Edition या एसयूव्हीमध्ये 10.1 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, वायरलेस एप्पल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो वायरलेस चार्जर, एम्बीएन्ट लाइटिंग, इलेक्ट्रिक सनरुफ, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, मल्टीफंक्शनल स्टीयरिंग व्हील्स, TPMS आणि ऍक्टिव्ह सिलेंडर मॅनेजमेंट सिस्टीम यासारखे बरेच फीचर्स देण्यात आले आहे.

पावर ट्रेन

Volkswagen Taigun GT Edge Trail Edition मध्ये 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. या इंजिनचा वापर टाइगुनच्या स्टॅंडर्ड मॉडेल मध्ये देखील करण्यात आला आहे. हे इंजिन 148 BHP पावर आणि 250 NM पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिन सोबत 6 स्पीड मॅन्युअल आणि 7 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स हे दोन ऑप्शन उपलब्ध आहेत. त्यानुसार तुम्ही दोन्ही पैकी एक निवडू शकता.