Volkswagen घेऊन येतेय सेल्फ ड्रायव्हिंग कार; मिळतील ‘हे’ खास फीचर्स

टाइम्स मराठी । मित्रानो, सध्याचा काळ हा तंत्रज्ञानाचा काळ आहे. जगात प्रत्येक क्षेत्रात टेक्नॉलॉजीच्या जोरावर नवनवीन गोष्टी साध्य करता येऊ लागल्या आहेत. ऑटोमोबाईल मार्केटच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, आधी पेट्रोल- डिझेल नंतर CNG गाड्या आणि इलेक्ट्रिक गाड्या मार्केट मध्ये धुमाकूळ घालत आहेत. त्यातच आता पुढची स्टेप म्हणजे लवकरच बाजारात सेल्फ ड्राइविंग कार लाँच होणार आहे. प्रसिद्ध ब्रँड Volkswagen 2026 मध्ये हि कार बाजारात आणणार असून यामध्ये अनेक आधुनिक तंत्रज्ञान तसेच अपडेटेड फीचर्स तुम्हाला पाहायला मिळतील. Volkswagen ची ही सेल्फ ड्राइविंग कार तुम्हाला अनोखा ड्रायव्हिंग अनुभव देईल.

   

फोक्सवॅगन कंपनीने यासाठी mobileye या कंपनीसोबत पार्टनरशिप केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार जुलै महिन्याच्या अखेरीस या कारची टेस्टिंग सुरू होणार आहे. त्यानंतर ही कार ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च होईल. पण अजूनही भारतामध्ये ही कार केव्हा लॉन्च होईल हे सांगता येत नाही. या सेल्फ ड्रायव्हिंग कारला सेफ्टी साठी ऍडव्हान्स ड्रायव्हिंग असिस्टंट सिस्टीम ADAS देण्यात येणार आहे. जेणेकरून ADAS मुळे रस्त्यावर कार चालवताना कोणताही अडथळा निर्माण झाला तर ही सिस्टीम ड्रायव्हरला अलर्ट करेल. आणि कोणताही अपघात होण्यापासून वाचू शकतो. ही टेक्नॉलॉजी रडार, कॅमेरा सेन्सर वर चालते. यावरून या कारमध्ये सेफ्टीची चांगली काळजी घेण्यात आलेली दिसून येते.

एका मीडिया रिपोर्टनुसार फोक्सवॅगन कंपनीने 2026 पर्यंत ऑस्टिन टेक्सास या ठिकाणी राईड हेलिंग आणि गुड्स डिलिव्हरी सर्विस साठी ऑटोनॉमस या सेल्फ ड्राइविंग कार लॉन्च करण्याची योजना बनवली आहे. त्याचबरोबर ही कंपनी पहिल्यांदा या टेक्नॉलॉजी सह कमर्शियल वाहने लॉन्च करणार आहेत. कंपनीने सांगितले की, ऑस्टीन मध्ये सुरक्षा ड्रायव्हर्स सोबत mobileye च्या ऑटोनॉमस ड्रायव्हिंग प्लॅटफॉर्म सह रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक वाहनांची टेस्टिंग केली जाईल. ही सेल्फ ड्रायव्हिंग टेक्नॉलॉजी रस्त्यावर नेवीगेशन दाखवण्यासाठी, ब्लाइंड स्पोर्ट डिटेक्शन, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, फॉरवर्ड कॉलिजन वॉर्निंग, लेन डिपार्चर वॉर्निंग, ऑटोमॅटिक ब्रेकिंग सिस्टीम, लेन सेंटरिंग असिस्टंट, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, ऑटोमॅटिक सेफ्टी फीचर्स सह परिपूर्ण आहे.