Volvo C40 Recharge ची डिलिव्हरी सुरु; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । वोल्वो कार इंडिया ने नवीनVolvo C40 Recharge ची डिलिव्हरी लवकरच सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. भारतीय बाजारपेठेतील ही वोल्वो कार इंडिया कंपनीची दुसरी इलेक्ट्रिक कार आहे. जर तुम्ही देखील ही कार खरेदी करू इच्छित असाल तर कंपनीच्या अधिकारी वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही एक लाख रुपयांची टोकन रक्कम जमा करून ऑनलाईन बुक करू शकतात. ही कार भारतीय बाजारपेठेमध्ये असलेल्या कीआ EV6 ला टक्कर देऊ शकते .

   

किंमत– Volvo C40 Recharge

वोल्वो C40 रिचार्ज या कारच्या किमती बद्दल बोलायचं झालं तर ही कार काही काळासाठी 61.25 लाख एक्स शोरूम किमतीमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये तीन वर्षांपर्यंत एक्सटेंडेड वॉरंटी, रोडसाइड असिस्टेंट, आठ वर्षांपर्यंत बॅटरी वारंटी, 11 किलो वाट वॉल बॉक्स चार्जर, देण्यात आले आहे. ही कार तुम्ही कंपनीच्या अधिकारीक वेबसाईटवर एक लाख रुपयांची टोकन रक्कम जमा करून बुक करू शकतात.

डिझाईन आणि फिचर्स

Volvo C40 Recharge या SUV च्या डिझाईन बद्दल बोलायचं झालं तर, या एसयूव्ही मध्ये पूर्णपणे बदल करण्यात आले आहे. वोल्वो C40 रिचार्ज मध्ये D पिलर आणि XC40 वर बदलण्यात आलेले व्हर्टिकल टेल लॅम्प एक स्लीकर कुप यासारखे रूफलाईन मिळते. वोल्वो C40 रिचार्ज SUV मध्ये इंटिग्रेटेड LED DRLs सह Thor Hammer LED हेडलॅम्प, स्पोर्टी अलोय व्हील, स्लिक एलईडी टेल लाईट देण्यात आले आहे. या SUV च्या केबिनमध्ये देखील बरेच बदल करण्यात आले आहे. यामध्ये 9 इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, 12.3 इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच हीटेड व्हेंटिलेटेड फ्रंट सीट, ड्युल जोन क्लाइमेट कंट्रोल , एक पैनोरमिक सनरुफ, वायरलेस चार्जर, 360 डिग्री कॅमेरा आणि ADAS हे फीचर्स यामध्ये देण्यात आले आहे.

बॅटरी

Volvo C40 Recharge या कारमध्ये 78 kwh लिथियम आयन बॅटरी पॅक उपलब्ध आहे. त्याचबरोबर यामध्ये AWD ड्राईव्ह टेन सह क्वीन इलेक्ट्रिक मोटर्स देखील जोडण्यात आली आहे. यामध्ये देण्यात आलेली बॅटरी DC फास्ट चार्जर ने 27 मिनिटात १० ते 80 टक्के चार्ज होते. आणि ही इलेक्ट्रिक कार एकदा फुल चार्ज झाल्यानंतर 530 किलोमीटर पर्यंत रेंज देण्यास सक्षम आहे. वोल्वो C40 चे टॉप स्पीड 180 असून अवघ्या 4.7 सेकंदामध्ये ही इलेक्ट्रिक कार झिरो ते शंभर किलोमीटर प्रति तास वेग वाढवण्यास सक्षम आहे.

वोल्वो कार इंडियाचे एमडी ज्योती मल्लोत्रा यांनी सांगितलं की, 030 पर्यंत पूर्णपणे इलेक्ट्रिक ऑटो निर्माता कंपनी बनण्यासाठी आमची कंपनी प्रयत्न करत आहे. वोल्वो C40 रिचार्ज ही आमची हत्वकांक्षी ऑनलाईन डायरेक्टच्या माध्यमातून लॉन्च होणारी दुसरी इलेक्ट्रिक कार आहे. ही कार विक्री मॉडेलच्या माध्यमातून डिलिव्हरी करण्यात येत आहे.