Volvo C40 Recharge EV : सिंगल चार्जवर 530 KM रेंज; Volvo ची Electric Car बाजारात घालणार धुमाकूळ

Volvo C40 Recharge EV : सध्या पेट्रोल- डिझेलचे वाढते दर आणि या गाड्यांमुळे वाढणारे प्रदूषण यामुळे अनेक ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळत आहे. भारतीय बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असून वाहन उत्पादक कंपन्याही वेगवेगळ्या आणि आकर्षकी गाड्या बाजारात आणत आहे. याच पार्श्वभूमीवर स्वीडिश ऑटोमोबाईल कंपनी Volvo ने आपली नवी इलेक्ट्रिक SUV Volvo C40 Recharge भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक SUV ची किंमत तब्बल 61.25 लाख रुपये ठेवली आहे. आज आपण या गाडीचे खास फीचर्स आणि रेंज याबाबत जाणून घेऊयात

   

लूक आणि डिझाईन –

Volvo C40 Recharge इलेक्ट्रिकच्या लूक आणि डिझाईन बाबत सांगायचं झाल्यास या कारचे डिझाईन XC40 रिचार्ज सारखेच आहे, यामध्ये एक तिरकस रूफ आणि शार्प असं टेलगेट आहे. गाडीच्या मागील बाजूस मागील बाजूस, C40 ला मोठ्या एलईडी लाईट गाइड सह बदललेले टेल-लॅम्प डिझाइन मिळते. तसेच स्लीक टेल लॅम्पसह ट्विन पॉड रूफ स्पॉयलर देखील आहेत, जे या SUV ला स्पोर्टी लुक देतेय. याशिवाय गाडीच्या हेडलाईटमध्ये पिक्सेल तंत्रज्ञानही देण्यात आले आहे.

फीचर्स – Volvo C40 Recharge EV

गाडीच्या केबिनमध्ये 90-इंच पोर्ट्रेट स्टाइल टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम आहे. याशिवाय डॅशबोर्डवर वुडन फिनिशसह सॉफ्ट टच मटेरियल देण्यात आले आहे. अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, यामध्ये 360 डिग्री कॅमेरा, वायरलेस फोन चार्जिंग, 12.3-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, ऍपल कार प्ले/अँड्रॉइड ऑटो, हरमन कार्डन साउंड सिस्टम, पॅनोरॅमिक सनरूफ,आणि ADAS तंत्रज्ञान आहे.

530 किमीपर्यंत रेंज –

Volvo C40 Recharge EV मध्ये ड्युअल मोटर सेटअप मिळते. जो 78 kWh बॅटरी पॅकशी जोडलेला आहे. कंपनीचा दावा आहे कि, 150kW फास्ट चार्जरने चार्ज केल्याने, ही बॅटरी फक्त 27 मिनिटांत 0-100 टक्के चार्ज केली जाऊ शकते. तसेच एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही कार तब्बल 530 किमीपर्यंत धावू शकते. या इलेक्ट्रिक कार मध्ये देण्यात आलेलू ट्विन इलेक्ट्रिक मोटर 408 एचपीची कमाल पॉवर आणि 660 एनएमचा पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. कंपनीने असाही दावा केला आहे ही कार फक्त 4.7 सेकंदात 0-100 किमी/ ताशी वेग पकडू शकते आणि गाडीचे टॉप स्पीड 180 किमी/तास आहे.

कोणाशी करेल थेट सामना

भारतीय बाजारपेठेत Volvo C40 Recharge EV ही इलेक्ट्रिक कार Hyundai Ioniq 5, Kia EV6, आणि Mercedes Benz EQB सारख्या गाड्यांना थेट टक्कर देईल.