इंस्टाग्राम रिल्समधून पैसे कमवायचेत? तर ‘या’ टीप्स नक्की फॉलो करा

टाइम्स मराठी | सध्या तरुणांमध्ये इंस्टाग्राम रिल्सची जास्त क्रेस दिसून येत आहे. इंस्टाग्राम (Instagram) या सोशल प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या कंटेंट घेऊन हजारो व्हिडिओ क्रिएटर्स दररोज रिल्स अपलोड करत असतात. यामुळे इतर तरुणांना देखील असे वाटते की, आपण या माध्यमातून पैसे कमवू शकतो. यासाठी ते अनेक वेगवेगळ्या प्रयत्न करायला देखील जातात. परंतु कोणत्या टिप्स वापरल्यानंतर या रिल्समधून पैसे मिळतात हे अनेकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यामधून रिल्सच्या (Reels) माध्यमातून पैसे कमावणे सहज सोपे जाईल.

   

लाखो रुपये कमावण्यासाठी या टिप्स फॉलो करा

1) जर तुम्हाला खरंच रिल्सच्या माध्यमातून पैसे कमवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला तुमचा योग्य कंटेंट निवडणे गरजेचे आहे. जर तुमचा कंटेंट लोकांना आवडेल असा असेल तर तो जास्त व्हायरल होईल आणि त्यामधून नक्की तुम्हाला पैसे मिळतील. इन्फॉर्मेशन, डान्स, क्रिएटिव्हिटी गाण्याचे रिल्स, अशा अनेक विषयांवर तुम्ही कंटेंट क्रिएट करू शकता. फक्त तो कंटेंट मनोरंजनासोबत लोकांना नव्याने काहीतरी माहिती देणारा देखील असायला हवा.

2) तुम्ही तुमचा व्हिडिओ कोणत्या फोन, कॅमेरामधून शूट करत आहात ते देखील महत्त्वाचे असते तुम्ही जर तुमच्या व्हिडिओची लो क्वालिटी वापरली तर तुम्हाला कोणताही फायदा होणार नाही. लो क्वालिटीवाले व्हिडिओ सोशल मीडियावर जास्त चालत नाही त्यामुळे कंटेंटसोबत व्हिडिओ कॉलिटी देखील तितकीच चांगली असणे आवश्यक आहे.

3) तुम्हाला जर तुमचे रिल्स जास्त व्हायरल करायचे असतील तर त्यासाठी तुम्ही वेगवेगळे ट्रेडिंग हॅशटॅग वापरा. हॅशटॅग हा सर्वात सोपा मार्ग आहे तुमचा अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा. तुम्ही व्हिडिओ अपलोड करण्यापूर्वी जास्त हॅशटॅगचा वापर करा. या हे हॅशटॅगमुळे तुम्ही ट्रेनिंग मध्ये येतात. आणि तुमचा व्हिडिओ देखील जास्त लोकांपर्यंत पोहोचेल.

4) तुम्ही जर सोशल मीडियामध्ये करिअर करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यावर सतत अपडेटेड राहणं गरजेचं आहे. त्यासाठी आठवड्यातून 4 वेळा किंवा दिवसातून 1 वेळा व्हिडिओ अपलोड करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही जर सोशल मीडियावर सतत सक्रिय राहिला तर तुमचे फॉलोवर्स वाढतील आणि व्ह्यूज देखील वाढतील. तुमचे व्ह्यूज वाढले की तुम्हाला आपोआप पैसे येण्यास सुरुवात होईल.

5) तुम्हाला या सर्व गोष्टींसोबत वेगवेगळे फिल्टर्स अशा गोष्टींकडे लक्ष देणे देखील गरजेचे आहे. नविन गाण्याचा वापर करून तुम्ही जास्त लोकांपर्यत पोहचू शकता. तसेच एखादा नविन टॉपिक घेवून तुम्ही त्यावर देखील व्हिडिओ बनवू शकता. एखादा विषय जर लोकांना माहिती नसेल तर त्याविषयी ऐकून घ्यायला त्यांना आवडते. तुम्ही जर तसेच व्हिडिओ केले तर तुम्हाला देखील लोकांची पसंती मिळवता येऊ शकते.

6) सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणताही व्हिडिओ बनवण्यापूर्वी तो किती सेकंदाचा झाला आहे हे तुम्ही जाणून घ्या. सध्याच्या काळात लोकांना जास्त मिनिटे असलेला व्हिडिओ पाहण्यासाठी तितका वेळ शिल्लक नसतो. त्यामुळे ते कमी वेळेत जास्त माहिती देणारा व्हिडिओ प्रेफर करतात. तुम्ही देखील तुमच्या व्हिडिओचा कालावधी कमी ठेवला तर लोक त्याला जास्त पाहतील. तसेच तुमचा व्हिडिओ लोकांना कंटाळावाणा वाटणार नाही.

7) तुम्ही तुमच्या माध्यमातून पीआरचे देखिल काम करू शकता. एखाद्या संस्थेचे काम तुम्ही जर तुमच्या माध्यमातून मांडायला गेला तर त्याचे पैसे ती संस्था तुम्हाला देते. किंवा एखाद्या चांगल्या हॉटेलचे दुकानांचे किंवा इतर काही गोष्टींची तुम्ही तुमच्या रिल्समधून प्रसिद्ध केली तर तुम्हाला त्याचे पैसे पेड केले जातात. या माध्यमातून तुम्ही जास्त पैसे कमवू शकता. तसेच तुम्हाला तुमचा महिन्याचा रोजगार देखील सुरू होऊ शकतो.

8) इंस्टाग्राम माध्यम हे सोशल असल्यामुळे त्यावर लाखों पेक्षा अधिक लोक प्रत्येक मिनिटाला सक्रिय असतात. त्यामुळे तुम्हाला तुमची माहिती नेमकी कोणत्या वयाच्या कोणत्या समाजाच्या कोणत्या गटाच्या लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे हे सर्वात प्रथम ठरवून घ्या. तुम्ही जर तुमचा एक फॉलो ग्रुप तयार केला तर तुम्हाला लोकांची आवड समजून घ्यायला जास्त मदत होईल. मुख्य म्हणजे तुम्ही दिलेल्या कंटेंटचा त्यांना देखील फायदा होईल. यातून तुम्हाला पैसे देखील मिळतील आणि प्रसिद्धी देखील.