अरे बापरे!! तब्बल 150 Km/Hr वेगाने वाहणार वारे; पुढील ५ दिवस ‘या’ भागांमध्ये हाय अलर्ट, IMD चा इशारा

टाइम्स मराठी ऑनलाईन । देशात अनेक भागात अजूनही कडकडीत उन्ह आहे. दरवर्षीपेक्षा यंदा जास्त गरमी असल्याचे बोलले जात आहे. उष्णतेचा पारा वाढल्याने मध्य भारतासह समुद्र किनाऱ्यालगतच्या भागात जगणे मुश्किल होऊन बसले आहे. यामुळे कधी एकदाचा पावसाळा सुरु होतोय अशी भावना सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. आता यासंबंधी एक महत्वाची अपडेट आली असून मान्सून भारतात दाखल झाला आहे.

   

अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे पश्चिमेकडील किनारी भागात हवामान विभागाने हाय अलर्ट जारी केला आहे. किनारी भागात ताशी १५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि तामिळनाडूच्या अनेक भागात या चक्रीवादळाचा प्रभाव पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जस जसे किनारपट्टीजवळ येईल तसतसे चक्रीवादळ बिपोरजॉय वेगाने तीव्र वादळात रूपांतरित होत आहे. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हवामान खात्याच्या ताज्या अपडेटनुसार, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेशात पुढील पाच दिवस पाऊस पडू शकतो. याशिवाय केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीपमध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच झारखंड आणि ओडिशामध्ये 11 ते 13 जून दरम्यान उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात केव्हा होणार पावसाळा सुरवात

आज ११ जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल झाले आहे. आजपासून पुढील पाच दिवस वेगवेगळ्या भागात पाऊस होणार आहे. मात्र खरा पाऊस साधारण २२ जून नंतरच सुरु होईल असे सांगितले जात आहे. ११, १२, १३,१४, आणि १५ जून रोजी महाराष्टरातील ठराविक जिल्ह्यांत पाऊस हजेरी लावेल परंतु त्यानंतर उघडीप मिळेल. आणि नंतर पुन्हा २२ जूननंतर पावसाळा सुरवात होईल असे सांगितले आहे.