Weekly Horoscope । जून महिन्यातील दुसरा आठवडा आता सुरु होत आहे. उद्या 12 जूनपासून सुरु होत असलेल्या या आठवड्यात कोणत्या राशीला काय लाभदायक आहे याबाबत आपण येथे जाणून घेणार आहोत. तुम्हाला सांगतो तुम्ही जर वृषभ, कन्या किंवा सिंह राशी पैकी असाल तर हा आठवडा तुम्हाला भरभराटीचा जाणार आहे. शिवाय मेष, मीन राशिंकरता हा आठवडा गुंतवणुकीसाठी लाभदायक ठरू शकतो. नव्या व्यवसायास सुरवात करण्याचा विचार करत असाल तर यावेळी अजिबात मागे वळून पाहू नका. कारण या आठवड्यात तुम्हाला नक्कीच यश प्राप्त होण्याची शक्यता आहे.
वृषभ –
या राशीतील व्यक्ती जवळच्या लोकांकडून दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. तुम्ही नोकरदार असाल तर तुम्हाला या आठवड्यात स्थिरता मिळे. विशेष घडामोडी होणार नाहीत. मात्र जे कराल त्यातून तुम्हाला धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक असो वा एखादा व्यवहार, तुम्ही विचार करून पाऊण उचलले तर तुम्हाला यशापासून कोणीच रोखू शकणार नाही. फक्त जे काही कराल ते करताना तुमच्याबाबत वाईट विचार करणाऱ्यांना चार हात लांब ठेवा. यश तुमच्या मागे मागे येईल.
कन्या –
तुमची राशी कन्या असेल तर तुम्हाला या आठवड्यात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. एकट्याने रात्रीचे लांबचा प्रवास करणे टाळा. शिवाय लहान सहन आजारांकडे कानाडोळा करू नका अन्यथा आजार वाढून तो कायमचा डोकेदुखी बनून राहू शकतो. शांत आणि संयम ठेवाल तर तुम्हाला या महिन्यात सर्व कामात यश मिळू शकते. उद्योग धंद्यांत धाडसी निर्णय घेतले तर धनप्राप्ती होईल.
सिंह –
तुम्हाला वैवाहिक जीवनात थोड्याशा अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जवळच्या मित्रांकडून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. मात्र लोकांची व्यवस्थित पारख करून विश्वास ठेवला तर तुमचे मन कोणी दुखावणार नाही. नोकरीमध्ये प्रामाणिक राहिलात तर हा आठवडा धनप्राप्ती करून देईल.