टाइम्स मराठी टीम (Weekly Horoscope) | जून महिना तुमच्याआयुष्यात नवीन काहीतरी घेऊन येणार आहे. हा महिना तुम्हाला वर्षातील सर्वात सुखद जाईल. तूळ, वृषभ आणि धनु राशीतील व्यक्तींना जून महिन्यात काही समस्यांचा सामना करावा लागेल परंतु योग्य मार्गदर्शन, संयम बाळगला तर तुम्ही सहजपणे सस्यांवर तोडगा काढाल. मेष, कुंभ आणि कर्क राशीतील लोकांना या महिन्यात लक्ष्मी प्रसन्न होईल. त्यांना गुंतवणुकीतून पैशांचा पाऊस पडेल, शेयर बाजारात फायदा होईल. जून महिना कोणत्या राशीतील लोकांना कसा जाईल याबाबत महान ज्योतिषी अनन्या दुबे यांनी टाइम्स मराठीच्या वाचकांसाठी लेख लिहिला आहे.
मेष
नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर हा महिना तुमच्यासाठी बेस्ट आहे. व्यवसायात व नोकरीत आर्थिक चनचन भासेल. परंतु योग्य ती खबरदारी घेतली तर महिन्याच्या अखेरीस प्रॉफिट होईल. नातेसंबंधांमध्ये ओलावा कायम राहील. शेअरबाजारात जास्त रिस्क न घेणे तुमच्यासाठी फायद्याचं आहे. असे केले तर तुम्हाला शेअर बाजारात छप्पर फाडके पैसा मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात खळबळजनक घटना घडण्याची शक्यता आहे. नोकरी शोधत असाल तर पायाला फिंगरी लावून मेहनत घ्याल तरच नोकरी मिळण्याची शक्यता आहे. Weekly Horoscope
वृषभ
वैवाहिक जीवनात स्थिरता मिळेल. नोकरीमध्ये प्रमोशन होऊ शकते. मात्र नवा व्यवसाय सूरु करण्याचा विचार करत असाल तर सावध रहा. मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. शेअरबाजारात रिस्क घेतली तर फायदा होऊ शकतो परंतु डोके शांत ठेऊन निर्णय घेणे फायद्याचे राहील.
मिथुन
तुम्ही लग्नासाठी जोडीदार शोधत असाल तर जून महिन्यात तुम्हाला तुमचा खास जोडीदार मिळू शकतो. वाहन चालवताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. रात्री उशिरा प्रवास करत असला तर व्यसन करणे टाळा अन्यथा अपघाताचा सामना करावा लागेल. शेअर बाजारात विशेष प्रॉफिट मिळणे मुश्किल आहे. वैवाहिक जीवनांत अडथळे येतील नातेसंबंध ताणले जातील परंतु तुम्ही त्यावर विजय प्राप्त कराल.
कर्क
शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी हा महिना विशेष आहे. तुम्ही योग्य अभ्यास करून गुंतवणूक केली तर तुम्हाला कधी मिळालेला नसेल इतका प्रॉफिट प्राप्त होईल. नव्या जोडीदाराचा शोध घेत असाल तर हा महिना तुम्ही थांबलात तर विनाकारण होणारी ससेहोलपट वाचेल. व्यवसायात प्रगती कराल परंतु मित्रांना वेळ दिला नाही तर जवळच्या काहींना गमवाल.
सिंह
जून महिना सिंह राशीतील व्यक्तींसाठी धोक्याची घंटा घेऊन आला आहे. या राशीतील लोकांना नातेसंबंधात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. लांबचा प्रवास करण्याने शारीरिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे. तसेच जवळच्या लोकांना पैशांच्या हव्यासापोटी गमावू शकता तेव्हा योग्य ती खबरदारी घ्यावी. शेअर बाजारात अभ्यास न करता गुंतवणूक कराल तर आहे तेवढी सगळी संपत्ती गमावून बसाल.
कन्या
वैवाहिक आयुष्यात आंनद प्राप्त होईल. लग्नासाठी जोडीदार शोधात असाल तर तुम्ही वाट पाहत असलेली व्यक्ती स्वतः तुमच्या दारात येऊन तुम्हाला मागणे घालेल. परंतु वैवाहिक जीवनातं अतिघाई कराल तर अनेक हृदयाजवळच्या लोकंना कायमचे गमावून बसाल.
तूळ
नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर धाडसी निर्णय घ्या. कोणतीही गोष्ट करताना डगमगाल तर तुमच्या हातून होणारे गौरव कार्य राहून जाईल. तेव्हा निर्णय घेताना स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा. आयोग्याच्या बाबतीत तुम्हाला काही किरकोळ समस्यांचा सामना करावा लागू शकतो. परंतु तुम्हाला काही व्याधी असतील अन तरी त्याकडे दुर्लक्ष कराल तर पुढे जाऊन मोठा पश्चाताप होईल. Weekly Horoscope
वृश्चिक
तुम्हाला या महिन्यात अनेक नवीन मित्र भेटतील मात्र काही जुने साथीदार आयुष्यभर लक्षात राहील अशा प्रकारे धोका देतील. वैवाहिक आयुष्यात स्थिरता असेल मात्र तुमचे विवाहबाह्य संबंध असतील तर तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागेल. शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर जून महिना तुमच्या साठी फायद्याचा राहील. नुकसान होण्याची शक्यता कमी राहील.
धनु
ऑफिस कामकाजात नवीन उंची गाठू शकता. यासाठी तुम्हाला या महिन्यात मेहनत करावी लागेल. तुमच्या जवळचे लोक तुमच्यावर लहान सहान कारणांवरून आरोप प्रत्यारोप करतील मात्र तुम्हाला डोके शांत ठेऊन त्यांना सामोरे जावे लागेल. जून महिन्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. परंतु चिडचिड न होऊ देता शांत राहाल तर सर्व समस्यांवर विजय प्राप्त कराल.
मकर
तुम्ही लग्नासाठी जोडीदार शोधत असाल तर जून महिन्यात तुम्हाला हवा तसा जोडीदार मिळणे कठीण जाईल. मात्र तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर या महिन्यात तुम्ही सदर व्यक्तीला प्रपोज केले तर होकार मिळण्याची शक्यता अधिक आहे. शेअर बाजारात गुंतवणूक धिक्याची ठरेल मात्र नवीन व्यवसाय व नोकरी यामध्ये उत्तुंग यश प्राप्त होईल. Weekly Horoscope
कुंभ
आयोग्याच्या बाबतीत तुम्हाला जून महिना आंनदी ठेवेल. तुमच्या पाल्यांना अकादमीक आयुष्यात चांगले यश प्राप्त होईल. व्यवसायात महिन्याच्या सुरवातीला अडचणींचा सामना करावा लागेल. परंतु तुमचे जुने मित्र तुम्हाला या काळात मदत करतील. वैवाहिक जीवनात थोडीसी ओढाताण जाणवेल परंतु तुम्ही यावर विजय मिळवाल.
मीन
या राशीतील व्यक्तींच्या आयुष्यात लक्ष्मी प्रसन्न होईल. नवीन व्यवसाय असो वा शेअर बाजार तुम्हाला मोठा फायदा होईल. परंतुनोकरी मध्ये हा महिना तुम्हाला अडचणींचा जाईल. तुमचे कोवर्कर्स तुम्हाला अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. परंतु तुमचे प्रामाणिक काम तुम्हाला या सर्वातून बाहेर काढेल. शेअर बाजारात रिस्क घेणे टाळावे. वैवाहिक जीवनात स्थिरता मिळेल.