डेबिट कार्डमध्ये वेगवेगळे प्रकार कोणते असतात? जाणून घ्या त्यावरील सर्व ऑफर्स

टाइम्स मराठी | बहुदा बँकेचे खाते काढले की, आपल्याला डेबिट कार्ड दिले जाते. डेबिट कार्डचा वापर आपण रोख रक्कम काढण्यासाठी किंवा पेमेंट करण्यासाठी करत असतो. डेबिट कार्डमुळे आपल्याला सतत बँकेत जायची गरज पडत नाही. यामुळे जास्त प्रमाणात ग्राहक डेबिट कार्डचा वापर करताना दिसतात. मात्र तुम्हाला हे माहित आहे का डेबिट कार्डचे किती प्रकार असतात? किंवा प्रत्येक डेबिट कार्डचा कोणत्या कारणासाठी वापर करण्यात येतो? नसेल माहित तर चला जाणून घेऊयात या डेबिट कार्डच्या प्रकारांविषयी.

   

रुपे डेबिट कार्ड (RuPay Debit Card)

स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, कॅनरा बँक, HSBC बँक, सिटी बँक आणि HDFC बँककडून RuPay Debit Card देण्यात येते. या डेबिट कार्डचा वापर आपण देशांतर्गत व्यवहार आणि रोग पैसे काढण्यासाठी करू शकतो. तसेच या डेबिट कार्डच्या माध्यमातून आपण ऑनलाइन खरेदी, ऑनलाइन बिल भरण्यासाठी करू शकतो. भारतातील 700 हून अधिक बँका आपल्या ग्राहकांना Rupay Card Pay करतात.

प्लॅटिनम कार्ड (Platinum Card)

जागतिक स्तरावर वापरण्यासाठी प्लॅटिनम कार्ड सर्वात फायदेशीर ठरते. या कार्डमध्ये आपल्याला कॅश डिस्बर्समेंटपासून ते ग्लोबल एटीएम नेटवर्कपर्यंतच्या सर्व सुविधा देण्यात येतात. या कार्डच्या माध्यमातून आपल्याला वैद्यकीय आणि कायदेशीर रेफरर मदत मिळते. तसेच या कार्डवर अनेक वेगवेगळ्या ऑफर्स डिस्काउंट आणि सुविधा देण्यात येतात.

मास्टर कार्ड (MasterCard)

जगातील सर्वाधिक लोक मास्टर कार्डचा वापर करताना दिसतात. मास्टर कार्ड हे आंतरराष्ट्रीय पातळीवर वापरता येऊ शकते. तसेच या कार्डद्वारे आपण कुठेही कधीही व्यवहार करू शकतो. मास्टरकार्ड जगभरातील 900 हून अधिक एटीएममध्ये वापरता येऊ शकते. मास्टर कार्ड आपल्याला स्टँडर्ड डेबिट कार्ड, एन्हांस्ड डेबिट कार्ड आणि वर्ल्ड डेबिट या तीन प्रकारांमध्ये उपलब्ध होते.

गोल्ड व्हिसा कार्ड (Gold Visa Card)

या डेबिट कार्डचा वापर आपण देशाबाहेर गेल्यावरही करू शकतो. तसेच या डेबिट कार्डवर अनेक वेगवेगळ्या ऑफर्स देण्यात येतात. गोल्डन कार्ड आपल्याला अतिरिक्त व्यवहार करण्याची मुभा देते. तसेच 3D सुरक्षित ईकॉमर्सच्या सुविधेचा लाभ देखील गोल्ड कार्डमध्ये आपल्याला मिळतो. या कार्डद्वारे आपल्याला रिटेल, डायनिंग आणि एंटरटेनमेंट आउटलेटवर विविध प्रकारच्या सवलती मिळवू मिळतात.

क्लासिक डेबिट कार्ड (Classic Debit Card)

या कार्डवर जगभरात सर्व प्रकारच्या ग्राहक सेवा उपलब्ध होतात. आपल्याला हे कार्ड कधीही बदलता येऊ शकते. या कार्डच्या मदतीने आपल्याला आपात्कालिन परिस्थितीत अॅडव्हान्स्ड कॅश काढता येते. हे कार्ड सुरक्षित पद्धतीने माहिती साठवून त्यावर प्रक्रिया करून ग्राहकाला अधिक सुरक्षितता देते. क्लासिक कार्ड हे एक बेसिक डेबिट कार्ड असल्यामुळे कार्डवरील व्यवहारावर काही मर्यादा देखील आहेत.