100 ऐवजी 110 च पेट्रोल टाकल्यास काय फरक पडतो? तुम्हीही असंच करता का?

टाइम्स मराठी । पेट्रोल पंपावर गेल्यावर बरेच जण 100 रुपया ऐवजी 110, १२०, ९० अशाप्रकारे किंमत सांगून पेट्रोल भरतात. याच्यामागे असलेली लॉजिक नेमकं काय आणि हे लॉजिक खरेच असेल का हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याच प्रश्नाचे उत्तर आज आपण मिळवणार आहोत. पेट्रोल पंपावर पेट्रोल पंपावर कामाला असलेले कामगार मीटर मध्ये किंमत सेट करतात आणि ग्राहकांना कमी पेट्रोल देतात असा दावा बऱ्याच जणांचा आहे. पण हे लॉजिक खरे की खोटे याची माहिती न घेता लोक पेट्रोल पंपावर गेल्यावर 100, 200, 300, 500 च्या ऐवजी 110, 109, 197, 199 हे आकडे सांगतात.

   

पेट्रोल पंपावर कामगारांचे काम सोपे व्हावे यासाठी बॉटम सिस्टीम देण्यात आली आहे. या सिस्टीम नुसार एखाद्या व्यक्तीला शंभर रुपयाचे पेट्रोल हवे असल्यास 1 नंबर तर 200 रुपयाचे पेट्रोल हवे 2 नंबर दाबल्यास पेट्रोल मिळते. यामुळे कर्मचाऱ्यांना अतिरिक्त त्रास कमी होतो आणि वेळही वाचतो. पण लोकांमध्ये याबाबत गैरसमज निर्माण झालेला असून त्यांच्या मते शंभर किंवा दोनशे रुपयाचे पेट्रोल टाकल्यास पंप वाले काहीतरी घोळ करतात आणि कमी पेट्रोल दिले जाते. असा ग्राहकांचा समज असतो. त्यामुळे काही ग्राहक पेट्रोल टाकत असताना 100 किंवा 200 चे न टाकता 110, १९० अशा किमती सांगून पेट्रोल भरतात.

पेट्रोल पंपावर पेट्रोलची चोरी मोठ्या प्रमाणात केली जाते. त्याचबरोबर पेट्रोल भरणारे कामगार या कोडच्या माध्यमातून पेट्रोल लिमिट फिक्स करतात त्यामुळे कमी पेट्रोल दिले जाते. असा ग्राहकांचा भ्रम आहे. पण खरंच शॉर्टकट की दाबून पेट्रोल देणारा व्यक्ती पेट्रोलची चोरी करत असेल का? किंवा 110- 197 याप्रमाणे पेट्रोल टाकल्याने खरंच पेट्रोल जास्त येत असेल का हे सांगता येत नाही. परंतु खरंच पेट्रोल पंपावर कोणत्याही प्रकारचा फ्रॉड होत आहे का हे जाणून घेण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करू शकतात. या पद्धतींमध्ये लिटमस पेपर किंवा लिटर मेजरमेंट मग ने तुम्ही पेट्रोल चेक करू शकता. म्हणजेच तुमचा संशय खरा आहे की खोटा हे समजू शकेल.