गाडीमधील ABS सिस्टीम नेमकी काय असते? त्याचे फायदे जाणून घ्या

टाइम्स मराठी । जेव्हा आपण टू व्हीलर खरेदी करण्यासाठी जातो, तेव्हा त्या वाहनांमध्ये आपण फीचर्स कोण कोणते आहेत आणि ABS सिस्टीम आहे की नाही हे चेक करतो. आपण खास करून एबीएस सिस्टीम असलेल्या वाहन खरेदी साठी सर्वात पहिली पसंती देतो. पण तुम्हाला माहिती आहे का एबीएस सिस्टीम का वापरले जाते. आणि त्याचा फायदा काय होतो. तर आज आपण हे जाणून घेणार आहोत की एबीएस सिस्टीम चा फायदा आणि एबीएस सिस्टीम बाईक मध्ये का आवश्यक आहे.

   

आज काल बऱ्याच बाईक्समध्ये ड्युअल चॅनल ABS आणि सिंगल एबीएस सिस्टीम वापरण्यात येत आहे. या सिस्टीमचा वापर चांगल्या पद्धतीने केला तर सेफ्टी वर त्याचा मोठा परिणाम दिसून येतो. ड्युअल चैनल मोड मध्ये दोन स्वतंत्र ब्रेक चैनल दिलेले असतात. यात एक समोर आणि एक मागील बाजूस असते. यामुळे बाईकची ब्रेकिंग कार्यक्षमता वाढते. त्याच प्रकारे सिंगल चॅनल एबीएस देखील ड्युअल चॅनल एबीएस प्रमाणे काम करत असते.

आजकाल टू व्हीलर्स मध्ये एबीएस स्टॅंडर्ड फिचर म्हणून वापरले जाते. चांगली सुरक्षा सेवा मिळणे हा या एबीएस सिस्टीमचा मेन उद्देश आहे. बाईकच्या सुरक्षा व्यवस्थेत झालेले बदल म्हणजेच फायदेशीर असलेली ही सिस्टीम आहे. अचानक ब्रेकिंग करताना चाकं लॉक होऊ नये यासाठी ड्युअल चॅनल एबीएस चा वापर केला जातो. पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा चिखल साचलेला असतो. अशावेळी आपली बाईक निसटू नये म्हणून एबीएस सिस्टीम स्टिअरिंग नियंत्रित करण्यासाठी मदत करते. आणि अपघात होण्यापासून देखील वाचवते.

एबीएस सिस्टीम ही रेसिंग बाईक सारख्या टू व्हीलर ला मोठ्या प्रमाणात उपयोगी असल्यास दिसून येतं. अचानक ब्रेक चा वापर करण्यासाठी आणि अचानक ब्रेक वापरल्यास गाडी निसटू नये यासाठी खास करून या सिस्टीम चा वापर केला जातो. जर तुम्हाला अर्जंट ब्रेक मारायची गरज पडल्यास तुम्हाला एबीएस सिस्टीम मोठ्या प्रमाणात मदत करू शकते. यामुळे तुमच्या वाहनावर नियंत्रण ठेवणे सोपे होते. ABS ही एक टेक्नॉलॉजी आहे. ज्यामुळे अपघाताचा धोका कमी होतो. हे ABS व्हील सेंसर पासून चालते. यामध्ये अचानक ब्रेक दाबल्यावर बाईकवर नियंत्रण ठेवण्यासाठी जास्त वेळ मिळतो. या टेक्नॉलॉजी मुळे सेन्सर अँटी लॉक ब्रेक ऑटोमॅटिकली सुरू होतात.