पृथ्वीवर लघुग्रह आदळल्यास काय होते? 65 मिलियन वर्षांपूर्वीचा इतिहास माहित आहे का?

टाइम्स मराठी । अवकाशात पृथ्वी ग्रह तारे याशिवाय उल्का (Asteroid) सारख्या बऱ्याच गोष्टी आहे. यापैकी उल्का ही प्रचंड वेगाने फिरत असते. प्रत्येक आठवड्यामध्ये आपल्याला लघुग्रह विषयी वेगवेगळ्या घटना समजत असतात. या घटना रियालिटी आहे की अफवा हा प्रश्न देखील आपल्याला पडत असेल. यापूर्वी सुमारे 65 मिलियन वर्षांपूर्वी लघुग्रहाने पृथ्वीला (Earth) घाईला आणले होते, त्यावेळी डायनासोरचा नामोनिशान मिटला होता.

   

हे लघुग्रह प्रचंड वेगाने फिरत असताना अचानक टक्कर झाल्यास त्याचा प्रचंड भयानक परिणाम होऊ शकतो. याबाबत नासाने एक रिसर्च केल्यानंतर सांगण्यात आलं की, अवकाशात मोठ्या लघुग्रहांपेक्षा लहान लघुग्रहांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे फारसा धोका निर्माण होऊ शकत नाही. या लघुग्रहांचा आकार छोटा असल्यामुळे पृथ्वीवर आदळल्यानंतर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. कारण या लघुग्रहांचा आकार लहान असल्यामुळे वातावरणात आणि हवेच्या संपर्कात आल्यावर ते लगेच जळतात. वातावरणात प्रवेश केल्यावर त्यांच्या संघर्षणामुळे त्यांचे आगीचे गोळे बनतात.

एका आकडेवारीनुसार दरवर्षी सुमारे चार मीटर आकाराचे लघुग्रह हे पृथ्वीवर आढळण्याची शक्यता असते. जसजसे जमिनीचे क्षेत्रफळ वाढेल तस तसे टक्कर होण्याची शक्यता देखील वाढते. 2023 मध्ये पृथ्वीच्या जवळ 50 लघुग्रह होते. यापूर्वी 2022 मध्ये हे लघुग्रह 126 एवढे होते. नासाकडून 2 ऑगस्टला दोन लघुग्रह पृथ्वीवर कोसळणार असल्याची माहिती देण्यात आली होती. परंतु त्यावेळी असं काहीच घडलं नाही. त्यावेळी लघुग्रह पृथ्वीच्या प्रचंड जवळ फिरत असल्याचं सांगण्यात आलं होतं.