E Mail मध्ये असलेले CC आणि BCC म्हणजे काय? त्याचा वापर कसा होतो?

टाइम्स मराठी । आपण दैनंदिन जीवनात E- Mail चा वापर करत असतो. कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट किंवा अन्य काही गोष्टी एक किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तींना पाठवण्यासाठी आपण E- Mail चा वापर करतो. म्हणूनच या ई- मेल बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही सुद्धा आत्तापर्यंत कोणाला ना कोणाला मी केले असतीलच. परंतु मेल सेंड करत असताना त्यामध्ये असलेले CC आणि BCC म्हणजे काय? हे दोन्ही ऑप्शन नेमके कशासाठी असतात याबत आज आपण जाणून घेऊयात.

   

ईमेलमध्ये बऱ्याच प्रकारचे फीचर्स उपलब्ध आहेत ज्याबद्दल आपल्याला माहिती नसते . अशा फीचर्स चा वापर करण्यासाठी ही माहिती घेणे गरजेची आहे. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे विना ई-मेल कोणतीच कंपनी काम करत नाही. संवाद साधण्यासाठी ई-मेल हा अति महत्त्वाचा घटक आहे. त्याचबरोबर ई-मेल वर्षानुवर्षांपासून वापरण्यात येतो. ई-मेल मध्ये असलेले एक ऑप्शन म्हणजे CC आणि BCC याबद्दल तुम्हाला माहिती नसेल. चला आज जाणून घेऊया CC आणि BCC बद्दल.

CC चा अर्थ –

ई-मेल मध्ये असलेला CC चा अर्थ कार्बन कॉपी तर BCC चा अर्थ ब्लाइंड कार्बन कॉपी असा होतो. तुम्ही लहान असताना कार्बन पेपर ऐकलं असेल. पूर्वी आपले डॉक्युमेंट दुसऱ्या कोणाला द्यायचे असेल तर त्या पेपरच्या खाली कार्बन ठेवून त्या डोकमेंट्सचे लिहून काम केले जात होते. जेणेकरून तुम्ही लिहून तयार केलेले डोक्यूमेंट्स दुसऱ्या पेजवर उमटेल. आणि तुम्ही दोन्ही डॉक्युमेंट्स डबल डबल न लिहिता एकाच वेळी दोन जणांना देऊ शकत होतात. त्याप्रमाणे ई-मेल मध्ये असलेला CC याच प्रकारचे काम करतो. जर तुम्हाला एकच ई-मेल दोन जणांना पाठवायचा असल्यास ईमेल पुन्हा तयार करण्यापेक्षा CC या ऑप्शन द्वारे एकाच वेळी दोन जणांना पाठवू शकतात. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या दोन जणांना हा मेल केलेला आहे हे CC मध्ये To कॉलम वाल्यांना देखील कळतं.

BCC म्हणजे काय?

ई-मेल मध्ये CC सोबतच BCC हा एक ऑप्शन दिसतो. हा दुसरा ऑप्शन म्हणजे ब्लाइंड कार्बन कॉपी. ही ब्लाइंड कार्बन कॉपी CC प्रमाणेच काम करते. जर तुम्ही एकच ई-मेल दोन किंवा तीन जणांना पाठवत असाल तर To कॉलम वाल्याना हे कळणार नाही की तुम्ही किती जणांना हाच ईमेल पाठवलेला आहे. म्हणजे BCC मध्ये तुम्ही कितीही जणांना ई-मेल पाठवला तरीही त्यांना कानोकान खबर लागू शकणार नाही. अशा प्रकारे तुम्ही CC आणि BCC या ऑप्शन चा उपयोग दैनंदिन कामांमध्ये करू शकतात. जेणेकरून तुमचं काम सोप्प आणि सोईस्कर होईल.