टाइम्स मराठी । जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp करोडो युजर्स वापरतात. Whatsapp ने आणलेल्या नवनवीन फीचर्स मुळे आपण ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम करू शकतो. मेटा कंपनीकडून whatsapp मध्ये वेगवेगळे फीचर्स अपलोड करण्यात येत आहे. यामुळे whatsapp वापरणे आता आणखीनच मजेशीर होत आहे. यासोबतच आता व्हाट्सअप मध्ये आणखीन फीचर्स लॉन्च करण्यात येणार आहे. सध्या व्हाट्सअप कडून नवनवीन फीचर्स वर काम सुरू असून आता लवकरच व्हाट्सअप वर युजर नेम सेट करण्याचे फीचर लॉन्च करण्यात येणार आहे. सध्या या फीचर वर काम सुरू असून Whatsapp वापरणे आता आणखीनच मजेशीर होईल.
काय आहे फीचर
WABETAINFO यांनी दिलेल्या माहितीनुसार, Whatsapp च्या ऐप सेटिंग मध्ये एक युजरनेम फीचर लॉन्च करण्याचे काम कंपनी करत आहे. हे फीचर प्रोफाइल सेक्शन मध्ये देण्यात येऊ शकते. त्यानुसार आता युजर कॉन्टॅक्टची ओळख मोबाईल नंबर नाहीतर युजरनेमने देखील करता येऊ शकते. यासोबतच युनिक आणि अट्रॅक्टिव्ह यूजर नेम बनवण्याचा ऑप्शन whatsapp मध्ये देण्यात येणार आहे.
Whatsapp च्या या फीचरच्या माध्यमातून मोबाईल नंबरची गरज भासणार नाही. आपण निवडलेल्या युजरनेमच्या माध्यमातूनच आपण चॅट करू शकणार आहे. या अपकमिंग फीचर बद्दल आणखीन माहिती मिळालेली नसून युजरनेमच्या माध्यमातून करण्यात आलेली चॅटिंग एन्ड टू एन्ड एनक्रीप्शन सह सुरक्षित करण्यात येईल. सध्या या फीचरवर काम सुरू आहे. परंतु लवकरच बीटा टेस्टरला टेस्टिंगसाठी देण्यात येईल अशी आशा आहे.
सध्या कंपनी इन्स्टंट मेसेजिंग एप्लीकेशन ग्रुप सेटिंग स्किन साठी नवीन इंटरफेस जारी करत आहे. त्यानुसार नवीन इंटरफेस पूर्वीपेक्षा जास्त अट्रॅक्टिव्ह क्लियर आणि इन्टिट्यूटिव्ह असेल. व्हाट्सअप सध्या वेगवेगळे फीचर्स अपलोड करत असून ग्राहकांसाठी काही फीचर्स लवकरच लॉन्च करण्यात येणार आहे. Whatsapp काम करत असलेल्या या युजरनेम फीचर लॉन्च झाल्यावर Whatsapp वापरण्यामध्ये आणखीनच मजा येईल.