Whatsapp ने आणलं नवं फीचर्स; AI स्टिकर्सच्या मदतीने चॅटिंग होणार आणखी मजेदार

टाइम्स मराठी । जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सअँप वर दोन मिलियन पेक्षा जास्त ॲक्टिव्ह युजर्स आहेत. सुरुवातीला Whatsapp हे फक्त इन्स्टंट मेसेंजर होते. परंतु आता वेगवेगळ्या फीचर्समुळे ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम आपण व्हाट्सअप द्वारे करू शकतो. व्हाट्सअप फीचर्स मध्ये मेसेजिंग, कॉलिंग ग्रुप मॅनेज, पर्सनल डॉक्युमेंट शेअरिंग यासारखे बरेच काम करू शकतो. त्यातच व्हाट्सअप आता नवीन नवीन अपडेट युजर साठी उपलब्ध करून देत आहे. असंच एक अपडेट आता व्हाट्सअप ने आणलेलं आहे. या नवीन अपडेट्स किंवा फीचर्सच्या मदतीने आता युजर्स AI स्टिकर्स क्रिएट करून शेअर करू शकता.

   

Whatsapp च्या या नवीन फिचरची माहिती WABetaInfo या ट्विटर अकाउंट वरून शेअर करण्यात आली आहे. व्हाट्सअप ने लॉन्च केलेले फिचर वापरण्यासाठी सर्वात आधी व्हाट्सअप कीबोर्ड मध्ये देण्यात आलेल्या स्टिकर टॅब ऑप्शनला सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला ज्या प्रकारचे स्टिकर हवे आहेत ते डिस्क्राइब करावे लागेल. तुम्ही दिलेल्या डिस्क्रिप्शननुसार तुम्हाला AI स्टिकर सेट दाखवण्यात येईल. त्यानुसार तुम्ही तुम्हाला आवडणारे स्टिकर्स निवडू आणि शेअर करू शकतात. हे AI स्टिकर्स मेटाच्या (AI Srickers) सिक्युअर टेक्नॉलॉजीने जनरेट केले जातात. यासोबतच यूजर कडे एआय स्टिकर्सचे पूर्णपणे कंट्रोल देण्यात येणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला एखाद्या स्टिकर बद्दल काही अडचण असेल किंवा आपत्ती जनक वाटत असतील तर तुम्ही मेटाला रिपोर्ट देखील करू शकता.

व्हाट्सअप ने लॉन्च केलेले हे नवीन फिचर पूर्णपणे ऑप्शनल आहे. म्हणजेच तुम्हाला हे फिचर वापरायचे नसेल तर तुम्ही ते इग्नोर करू शकतात. जर हे फिचर तुम्ही वापरू इच्छित असाल तर दिलेल्या प्रोसेस नुसार त्याचा वापर तुम्ही करू शकता. लॉन्च करण्यात आलेल्या फिचर नुसार तयार करण्यात आले AI स्टिकर सहज ओळखता येतात. ते काही बीटा टेस्टरसाठी लॉन्च करण्यात आले आहे. जर तुम्ही बीटा यूजर असाल तर तुम्ही बीटा फॉर अँड्रॉइड 2.23.17.14 अपडेट मध्ये ते वापरू शकता.