Whatsapp AI Stickers : Whatsapp ने आणलं AI स्टिकर्स; अशा प्रकारे करा वापर

टाइम्स मराठी । जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp वर दोन मिलियन पेक्षा जास्त ॲक्टिव्ह युजर्स आहेत. सर्वांचे आवडत असे हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. Whatsapp फीचर्स मध्ये मेसेजिंग, कॉलिंग ग्रुप मॅनेज, पर्सनल डॉक्युमेंट शेअरिंग यासारखे बरेच काम करू शकतो. त्यातच Whatsapp आता नवीन नवीन अपडेट युजर साठी उपलब्ध करून देत आहे. या नवीन अपडेट्स किंवा फीचर्सच्या मदतीने आता युजर्स AI स्टिकर्स (Whatsapp AI Stickers ) क्रिएट करून शेअर करू शकतात. हे AI स्टिकर्स क्रिएट करण्यासाठी आता AI मदत करणार आहे. व्हाट्सअप ने आणलेले हे नवीन फिचर कशाप्रकारे वापरल्या जाते याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

   

काय आहे हे फीचर

Whatsapp मध्ये उपलब्ध करण्यात आलेले हे फीचर ( Whatsapp AI Stickers )तुम्हाला AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजंट हे काही व्हाट्सअँप स्टिकर्स  सुचवेल. जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल. कोणत्याही स्टिकर्सला पुढे पाठवण्यासाठी तुम्हाला त्यावर टॅप करावं लागेल.  हे AI स्टिकर्स मेटाच्या सिक्युअर टेक्नॉलॉजीने जनरेट केले जातात.  यासोबतच यूजरकडे AI स्टिकर्सचे पूर्णपणे कंट्रोल देण्यात येणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला एखाद्या स्टिकर बद्दल काही अडचण असेल किंवा आपत्ती जनक वाटत असतील तर तुम्ही मेटाला रिपोर्ट देखील करू शकता.

अशा पद्धतीने बनवा AI स्टिकर– Whatsapp AI Stickers

Whatsapp ने हे फीचर बीटा टेस्टिंग साठी उपलब्ध करून दिले होते.  आता हे फीचर Whatsapp युजर साठी उपलब्ध करण्यात आले आहे. या फीचर च्या माध्यमातून AI म्हणजेच आर्टिफिशल इंटेलिजंट आपल्याला AI स्टिकर्स बनवण्यासाठी मदत करेल. त्यासाठी Whatsapp वर जाऊन  कोणत्याही चॅट वर क्लिक करा.  त्यानंतर स्टिकर विंडो ओपन करण्यासाठी इमोजी आयकॉन वर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला Make Your Own AI स्टिकर्स हाऑप्शन दिसेल. या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर क्रिएट वर क्लिक करा. आणि ॲनिमेटेड स्टिकर बनवण्यासाठी काही टेक्स्ट टाईप करा.

सर्व Whatsapp युजर साठी उपलब्ध

Whatsapp ने लॉन्च केलेले हे नवीन फिचर (Whatsapp AI Stickers )पूर्णपणे ऑप्शनल आहे. म्हणजेच तुम्हाला हे फिचर वापरायचे नसेल तर तुम्ही ते इग्नोर करू शकतात. जर हे फिचर तुम्ही वापरू इच्छित असाल तर दिलेल्या प्रोसेस नुसार युज करू शकतात. लॉन्च करण्यात आलेल्या फिचर नुसार तयार करण्यात आले AI स्टिकर सहज ओळखता येतात. आता हे फीचर सर्व व्हाट्सअप युजर साठी उपलब्ध करण्यात आले आहे.  तुम्हाला देखील हे Whatsapp फीचर्स हवे असेल तर तुम्हाला Whatsapp पुन्हा अपडेट करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे ऑप्शन दिसेल.