आता मोबाईल हातात न घेता Whatsapp वर रिप्लाय करा; कसे ते पहा

टाइम्स मराठी | Whatsapp या इन्स्टंट मेसेजिंग एप्लीकेशनच्या माध्यमातून आज- काल ऑफिशियल पर्सनल कामे करणे सोपे झाले आहे. META कंपनीकडून Whatsapp मध्ये बरेच फीचर्स  लॉन्च करण्यात आले असून काही फीचर्स वर काम सुरू आहे. या फीचरच्या माध्यमातून Whatsapp वापरणे आणखीनच मजेशीर झाले आहे. या Whatsapp फीचर्स मध्ये चॅटिंग, व्हिडिओ ऑडिओ कॉलिंग, HD फोटो शेअरिंग, ब्रॉडकास्ट लिस्ट, कम्युनिटी ग्रुप, चॅनल्स, यासारखे बरेच  गरजेचे फीचर्स उपलब्ध आहेत. यापैकीच एक फीचर म्हणजे Auto Reply Features…. जाणून घेऊया काय आहे हे फीचर….

   

Auto Reply Features च्या माध्यमातून यूजर्स मोबाईल हातात न घेता किंवा मोबाईल फोन टच न करता कोणत्याही प्रकारची चॅट न करता मेसेजला रिप्लाय करू शकतात. हे व्हाट्सअप बिजनेस मध्ये उपलब्ध असलेले फीचर आहे. जेव्हा एखादा युजर्स ग्राहकांना रिप्लाय करू शकत नाही तेव्हा या फीचर्सचा वापर करण्यास अनुमती मिळते. म्हणजेच तुम्ही  सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन नसाल तेव्हा तुम्हाला एखादा व्यक्तीचा मेसेज आल्यास तुम्ही सेट केलेला मेसेज रिप्लाय म्हणून पाठवण्यात येतो.

जर तुम्ही एखादा बिजनेस सांभाळत असाल तर तुम्हाला हे फीचर उपयोगी पडू शकते. बऱ्याचदा बिजनेस सांभाळत असताना व्हाट्सअप युजर्स ला रिप्लाय करण्यासाठी  वेळ मिळत नाही. अशावेळी तुम्ही ऑटो रिप्लाय फीचर वापरू शकतात. हे फीचर फक्त बिझनेस व्हाट्सअँप युजर साठी उपलब्ध आहे. तुम्ही देखील ऑटो रिप्लाय फीचर्स वापर करू इच्छित असाल तर दोन पद्धतीने हे फीचर्स सेट करू शकतात. त्यापैकी पहिले ऑप्शन म्हणजे
1) Whatsapp बिजनेस अकाउंट वरून हे फीचर सेट करणे. 
2) Whatsapp पार्टनर प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून फीचर सेट करणे.

या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून दुसरा युजर्सला मेसेज पाठवण्यावर मर्यादा  लावण्यात आली आहे. म्हणजेच तुम्ही समोरच्या व्यक्तीला कोणत्या प्रकारे मेसेज पाठवू शकता हे स्वतः ॲप ठरवते. ऑटो रिप्लाय फीचर अशा पद्धतीने करू शकतात  सेट

1)  सर्वात पहिले व्हाट्सअप सेटिंग मध्ये जा.
2) त्यानंतर तुमच्या अकाउंट मध्ये  डाव्या साईडला तुम्हाला तीन डॉट दिसतील. त्या डॉट वर क्लिक करा.
3) त्यानंतर बिजनेस टूल्स वर क्लिक करा.
4) बिझनेस टूल्स वर गेल्यानंतर तुम्हाला ALWAY MESSAGE ऑप्शन दिसेल. हे ऑप्शन सिलेक्ट करा.
5) त्यानंतर send away message या टॉगल बटन वर क्लिक करून ऍक्टिव्ह करा.
6) away message  एडिट करा. एडिट केल्यानंतर तुम्ही  यामध्ये मेसेज ॲड करू शकतात.
7) यानंतर मेसेज केव्हा पाठवायचा आहे त्यासाठी शेड्युल बटन दिसेल त्यावर क्लिक करा.
8) तुम्ही ज्या व्यक्तीला मेसेज सेंड करू इच्छित आहात त्यांना सिलेक्ट करू शकतात.
9) यानंतर ऑटो रिप्लाय सेट होईल.