टाईम्स मराठी । देशात व्हाट्सअपचे 50 करोड पेक्षा जास्त युजर्स आहेत.आता भारतीय युजर्स कडून तक्रार आल्यानंतर व्हाट्सअप कडून मे महिन्यात 65 लाख व्हाट्सअप अकाउंट बॅन करण्यात आले आहे. याबाबत रविवारी घोषणा करत कंपनीने याबद्दल माहिती दिली. ही कारवाई आयटी नियम 2021 यानुसार करण्यात आली आहे. त्याचबरोबर 1 मे ते 31 मे पर्यंत 6, 508,000 व्हाट्सअप अकाउंट बॅन करण्यात आले असून त्यातील 2,420,700 अकाउंट तक्रार येण्यापूर्वी बंद करण्यात आले आहे.
त्यातच सोशल मीडिया युजर्सला सक्षम बनवण्यासाठी काही दिवसांपूर्वी केंद्राकडून तक्रार समिती जीएससी लॉन्च करण्यात आली आहे. ही समिती यूजर च्या समस्या सोडवू शकेल असा त्यामागचा उद्देश आहे. नव्याने स्थापन केलेल्या पॅनल प्रौद्योगीकी क्षेत्रातील कंपन्यांवर लगाम लावण्यासाठी आणि डिजिटल कायदे मजबूत करण्यासाठी हे एक पाऊल केंद्राने उचलले आहे. ज्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नियमांच्या विरोधात जाणाऱ्या युजर्सवर कडक कारवाई केली जाईल.
व्हाट्सअप ने जानेवारी मध्ये 29 लाख अकाऊंट, त्यानंतर फेब्रुवारी मध्ये 45 लाख, एप्रिलमध्ये 74 लाख पेक्षा जास्त व्हाट्सअप अकाउंट बॅन केले होते. फक्त व्हाट्सअप नाही तर इंस्टाग्राम आणि फेसबुक वर देखील बरेच अकाउंट बॅन करण्यात येत आहे. एप्रिलमध्ये फेसबुकवर 27% तर इंस्टाग्रामवर 40% अकाउंट बंद करण्यात आले होते. त्याचबरोबर आता हा आकडा वाढवून फेसबुकवर 16,995 तर instagram वर 68% टक्के तक्रारी आल्या होत्या. त्यावर कारवाई देखील करण्यात आली आहे.